Download App

Lithium : देशासाठी गुड न्यूज! चीनची दादागिरी संपणार, काश्मीरमध्ये लिथियमचा साठा

  • Written By: Last Updated:

“इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या बॅटरीमध्ये (Electric vehicle battery) वापरासाठी गरजेचा असलेल्या ५९ लाख टन लिथियमचा (Lithium) साठा जम्मू-काश्मीरमध्ये सापडला आहे.” केंद्र सरकारने गुरुवारी ही माहिती दिली. भविष्यात हा सर्वात उपयुक्त खजिना ठरेल. त्याची खासियत म्हणजे हा एक नॉन-फेरस धातू आहे, जो इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या बॅटरीमध्ये वापरणे आवश्यक आहे.

केंद्रीय खाण मंत्रालयाने (Ministry of Mines) गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार “भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाला पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना भागात अंदाजे ५९ लाख टन लिथियमचे साठे सापडले आहेत.” भविष्यात लिथियमची मागणी मोठी वाढणार आहे कारण लिथियम हे इलेक्ट्रॉनिक बॅटरी बनवण्यासाठी वापरली जाते आहे. सध्या जगभरात चीन आणि ऑस्टेलिया हे लिथियमचे मोठे पुरवठादार आहेत. आता भारताचा स्वतःचा साठा सापडला आहे त्यामुळे चीनचे वर्चस्व कमी होणार आहे.

Nana Patole : तुमचे नेतृत्व कमकुवत होते का? , पटोलेंचा राऊतांवर पलटवार

खाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “लिथियम आणि सोन्यासह ५१ खनिज ब्लॉक संबंधित राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आले आहेत. या ५१ खनिज ब्लॉक्सपैकी ५ ब्लॉक्स सोन्याचे असून आणि इतर ब्लॉक्स जम्मू आणि काश्मीरसह ११ राज्यांमध्ये आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. हे ब्लॉक्स पोटॅश, मॉलिब्डेनम, बेस मेटल इत्यादी वस्तूंशी संबंधित आहेत.

भारत लिथियमचा खूप मोठा वाटा आयात करतो. २०२० पासून लिथियम आयातीच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. भारत सध्या लिथियम-आयर्न बॅटरीपैकी ८०% चीनमधून आयात करतो. या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी भारत अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया आणि बोलिव्हिया यांसारख्या लिथियमअसलेल्या देशांमधील खाणीमध्ये हिस्सा खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Tags

follow us