Download App

Live Blog । “भारताच्या आवाजासाठी लढतोय, कोणतीही किंमत..” राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

  • Written By: Last Updated:

सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुिनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना आज दुपारी जाहीर केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. या निर्णयानंतर आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा मोठा संघर्ष सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.

राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या काही वक्तव्यांवरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. त्यातून संसदेचे  कामकाज ठप्प झाले  आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर हे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांची रद्द झालेली खासदारकी आणि देशभरातील प्रतिक्रिया याचे सर्व अपडेट पहा

LIVE NEWS & UPDATES

  • 24 Mar 2023 06:19 PM (IST)

    हा निर्णय बुमरँग होईल, जयंत पाटील यांचा इशारा

    राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवणे, हा कायद्याचा गैरवापर आहे.देशाला लुटून परदेशात फरार व्यक्तींना चोर म्हणणे हा गंभीर गुन्हा नाही. राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेला घाबरून लोकसभा अध्यक्षांच्या आडून निर्णय घेतलेला दिसतो. हा निर्णय बुमरँग होईल, याची मला खात्री आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका.

  • 24 Mar 2023 05:56 PM (IST)

    राहुल गांधी यांचा जुना व्हिडीओ व्हायरल

    राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर ट्विटरवर त्यांचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  ‘खत्तम, बाय-बाय, टाटा, गुड बाय, गया’चा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल होत आहे.

     

     

  • 24 Mar 2023 05:54 PM (IST)

    जनमताचा खून, काँग्रेसची टीका

    काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून देखील टीका करण्यात आली. जनमताचा खून असं कॅप्शन लिहीत त्यांनी एक चित्र शेअर केलं आहे.

     

  • 24 Mar 2023 05:46 PM (IST)

    राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

    लोकसभा सदस्यत्व निलंबित केल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे.

    आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. कोणतीही किंमत चुकवायला तयार आहे."

  • 24 Mar 2023 04:52 PM (IST)

    अध्यादेश टराटरा फाडला, मनमोहन सिंगाचा अपमान केला; राहुल गांधींना अहंकार नडला

    सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर काँग्रेससह  (Congress) देशभरातील विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत. मात्र, आज खासदारकी रद्द होण्यामागे आता राहुल गांधी यांनी साधारण 10 वर्षापूर्वी भर पत्रकार परिषदेतील त्यांची कृतीच त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमकं 10 वर्षांपूर्वी राहुल गांधींनी असं काय केलं होते ज्यामुळे आज खासदारी गेल्यानंतर त्यांना पश्चाताप होत असेल.

    अध्यादेश टराटरा फाडला, मनमोहन सिंगाचा अपमान केला; राहुल गांधींना अहंकार नडला

  • 24 Mar 2023 04:51 PM (IST)

    राहुल गांधींची खासदारकी घालवणारे पूर्णेश मोदी कोण ?

    राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली. गुजरातमधील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. यामुळे राहुल गांधी यांना शिक्षा तर झालीच पण खासदारकीही गमवावी लागली आहे. ज्यांच्यामुळे राहुल गांधींना संसदेतूनच बाद व्हावं लागलं ते पूर्णेश मोदी कोण आहेत?

    Who is Purnesh Modi : राहुल गांधींची खासदारकी घालवणारे पूर्णेश मोदी कोण ?

  • 24 Mar 2023 04:41 PM (IST)

    देशात संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी सुरत न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. या देशात संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही असे बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

     

    राहुल गांधींची खासदारकी गेली; बावनकुळे म्हणाले, सत्यमेव जयते !

  • 24 Mar 2023 04:40 PM (IST)

    सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा

    ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ (PRAKASH BAL) यांनी ‘राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला चोख उत्तर द्यायचं असेल तर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा’, असा सल्ला दिला आहे.

    PRAKASH BAL ; …तर लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत राजीनामे द्या

  • 24 Mar 2023 04:39 PM (IST)

    खरं बोलण्याची किंमत राहुल गांधींना चुकवावी लागली

    राहुल गांधी सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर खरं बोलले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. राहुल गांधी नेहमी वस्तुस्थिती मांडत आले. नोटाबंदी असो, चीनसोबतच वाद असो किंवा जीएसटी असो. त्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार हे सर्व करत आहे. अशी टीका आज काँग्रेसकडून आज करण्यात आली आहे.

     

    लालू प्रसाद यादव ते जयललिता या दिग्गज नेत्यांना गमवावी लागली होती, आमदारकी व खासदारकी

Tags

follow us