Download App

Living Planet Report : भारतीय अन्नपदार्थ जगात भारीचं; केंद्र सरकारच्या ‘मिशन मिलेट’ चीही प्रशंसा

सर्व देशांनी भारताचा पॅटर्न स्वीकारल्यास 2050 पर्यंत पृथ्वीचे होणारे नुकसान लक्षणीयरीत्या कमी होईल, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

  • Written By: Last Updated:

Living Planet Report 2024 : भारतीय खाद्यपदार्थ हे जगात सर्वोत्तम असल्याचा शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने (WWF) 2024 साठीचा लिव्हिंग प्ल्रॅनेट अहवाल जारी केला आहे. यात भारतीय खाद्यपदार्थांमुळे (Indian Food) हरितवायू उत्सर्जन कमी होत असल्याचाही उल्लेख करण्यात आला असून, सर्व देशांनी भारताचा पॅटर्न स्वीकारल्यास 2050 पर्यंत पृथ्वीचे होणारे नुकसान लक्षणीयरीत्या कमी होईल, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

ताणतणाव टाळा, हेल्दी राहा..! जाणून घ्या, मानसिक आरोग्याचं महत्व अन् इतिहास

भारतानंतर इंडोनेशिया, चीन, जपान आणि सौदी अरेबिया या देशांना सर्वोत्तम अन्नप्रणालींमध्ये स्थान देण्यात आले आहे. तर अहवालात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेची खाण्याची शैली सर्वात वाईट असल्याचे नमुद करण्यात आले आहे. जारी करण्यात आलेल्या अहवालात भारताच्या मिलेट मिशनचा (नॅशनल मिलेट मिशन) विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

जगाने भारताकडून शिकण्याची गरज

स्वित्झर्लंड स्थित WWF या संस्थेची स्थापना 1961 मध्ये झाली. ही संस्था वन संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणावरील मानवी प्रभाव कमी करण्यासाठी कार्य करते. 2024 साठीच्या लिव्हिंग प्ल्रॅनेट अहवालात संस्थेने जर सर्व देशांनी भारताच्या अन्न पद्धतीचा अवलंब केला तर 2050 पर्यंत आपल्या ग्रहावरील 84 टक्के संसाधने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी असतील. यामुळे जागतिक तापमानवाढही कमी होईल आणि पर्यावरणाचा समतोल सुधारेल असा सल्लाही देण्यात आला आहे.

Video : फेस्टिव सिजनमध्ये शॉपिंग करणाऱ्यांची बल्ले-बल्ले; RBI ने घेतले तीन मोठे निर्णय

मोठ्या देशांचे खाद्यपदार्थ धोकादायक

जर संपूर्ण जगाने G-20 देशांसारख्या मोठ्या देशांचे खाद्यपदार्थ स्वीकारले तर 2050 पर्यंत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सात पृथ्वीची गरज भासेल. अन्नासाठी हरितवायू उत्सर्जन मानक 1.5 अंश सेल्सिअस आहे. G-20 देशांच्या खाण्याच्या पद्धतीचा सर्व देशांनी अवलंब केला तर, तापमानवाढीत 263 टक्के अधिक वाढ होईल असा सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे.

भारताच्या मिलेट मिशनची प्रशंसा

लिव्हिंग प्ल्रॅनेट अहवालात भारत सरकारने हवामानास अनुकूल बाजरीला प्रोत्साहन देण्यासाठी राबविलेल्या मिलेट मिशनचीदेखील प्रशंसा करण्यात आली आहे. बाजरी आरोग्यासाठी चांगली आणि हवामान बदलासाठी अत्यंत लवचिक आहे. अधिक शाश्वत आहार घेतल्यास शेतात अन्न उत्पादनाची गरज कमी होईल, असे अहवालात म्हटले आहे.

दीर्घकाळ जिवंत राहतात ‘या’ देशांतील लोक; जाणून घ्या, रिसर्चमध्ये आहे का भारताचं नाव..

जगात 73 % वन्यजीव कमी झाले

LPR 2024 नुसार, गेल्या 50 वर्षांत जागतिक वन्यजीव लोकसंख्येमध्ये 73% घट झाली आहे. दोन वर्षांपूर्वी ही घसरण 69% होती. यापैकी सर्वाधिक 85% घट गोड्या पाण्यातील सजीवांमध्ये आढळून आली आहे, त्यानंतर जमिनीवरील सजीवांमध्ये 69% आणि सागरी जीवांमध्ये 56% घट झाली आहे. दक्षिण अमेरिका, कॅरिबियन बेटे, आफ्रिका, आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात सर्वात मोठी घट दिसून आली आहे. आशिया-पॅसिफिक प्रदेशात वन्यजीवांच्या संख्येत सरासरी 60% घट झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

follow us

संबंधित बातम्या