चुकीच्या आहारामुळे भारतीयांना असंसर्गजन्य आजारांनी ग्रासलं; ICMR-NIN ने जारी केला डाएट प्लॅन

चुकीच्या आहारामुळे भारतीयांना असंसर्गजन्य आजारांनी ग्रासलं; ICMR-NIN ने जारी केला डाएट प्लॅन

ICMR-NIN releases diet plan for all age groups : मानवी जीवनशैलीमध्ये आहार हा महत्त्वाची भूमिका बजावतो याच पार्श्वभूमीवर इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि राष्ट्रीय पोषण संस्था ( ICMR-NIN ) यांनी सर्व वयोगटातील भारतीयांसाठी नवीन आहार विषयक मार्गदर्शक तत्त्वे ( diet plan ) जारी केले आहेत. यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि राष्ट्रीय पोषण संस्थेच्या संचालक डॉक्टर हेमलता आर. यांच्या मार्गदर्शनाखाली 17 सर्व समावेशक शिफारशींचा एक गट तयार करण्यात आला होता.

सोशल मीडियावर हिरो, पण वसंत मोरे पुण्याच्या मैदानावर ठरले झिरो; फॉलोवर्स गेले कुठे?

गेल्या काही दशकांपासून भारतीयांच्याआहारामध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. ज्यामुळे असंसर्गजन्य रोगांचं प्रमाण वाढलं आहे. त्याचबरोबर कुपोषणाच्या समस्या देखील कमी होताना दिसत नाहीत. त्यासाठीच भारतीयांनी बदलत्यापरिस्थितीशी सुसंगत अशी आपली आहार प्रणाली ठेवावी. म्हणून या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी! खासदार नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला

त्याचबरोबर आयसीएमआरने या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सर्वच वयोगटातील भारतीयांसाठी आहार विषयक मार्गदर्शक तत्व सांगितले आहेत. त्यामध्ये विशेषतः असंसर्गजन्य आजार टाळण्यासाठी कशा पद्धतीचा आहार असावा? यावर भर देण्यात आला आहे. डॉक्टर राजू बहल यांनी प्रकाशित केलेला हा तब्बल 148 पानांचा हा मार्गदर्शक तत्त्वांचा अहवाल आहे. जीवनशैलीनुसार कशा प्रकारचा आहार घ्यावा? याबाबत वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यास करून सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे की भारतातील एकूण आजारांपैकी 56.4% आजार हे असंतुलित आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे होत आहेत.

अकाली मृत्यूचं प्रमाण वाढलं…

तसेच आरोग्यदायी जीवनशैलीमुळे अकाली मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकतं. ज्यासाठी साखर आणि चरबी युक्त अतिप्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ यांच्या वापरामध्ये झालेली वाढ कमी शारीरिक हालचाली. निवडकच पदार्थांचं होणारं सेवन सूक्ष्म पोषण तत्त्वांची कमतरता तसेच वाढत्या वजनाची समस्या या सर्वांमुळे अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलं आहे.

ICMR-NIN ने जारी केला डाएट प्लॅन!

– एका व्यक्तीच्या दिवसभरातील आहारामध्ये कमीत कमी आठ वेगवेगळ्या अन्नपदार्थातील मायक्रोन्यूट्रियन्स असणे गरजेचे. ज्यामध्ये भाज्या, फळं हिरव्या पालेभाज्या, कंदमुळे यांचा समावेश आहे.
– भाज्या आणि शेंगा त्यांचा आहारात समावेश असावा.
– दररोज दोन हजार किलो कॅलरीचे अन्न ग्रहण करणे आवश्यक.
– ज्यामध्ये 250 ग्रॅम तृणधान्य, 400 ग्रॅम भाज्या, 100 ग्रॅम फळं, 85 ग्रॅम डाळी/अंडी/ मांस, 35 ग्रॅम काजू आणि इतर बिया, 27 ग्रॅम तेलकट किंवा चरबीयुक्त पदार्थांचा समावेश असावा.
– तृणधान्यांचा वापर 50% पेक्षा जास्त नसावा जो सध्या सामान्यपणे 70 टक्के आहे.
– कडधान्य अंडी आणि मांसाहार 14 ते 15 टक्के असावा.
– चरबीयुक्त पदार्थांचे सेवन एकूण आहाराच्या 30% ऊर्जा देणारे असावं.
– काजू, तेलबिया, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण अनुक्रमे दररोज एकूण आहाराच्या केवळ आठ ते दहा टक्के ऊर्जा प्राप्त होईल एवढं असावं.

काय करावे, काय टाळावे?

– संतुलित आहार घेण्यावर भर द्या.
– शारीरिक सक्रियता वाढवा, व्यायाम काही प्रमाणात शारीरिक कष्ट करा.
– गर्भवती, स्तनदा माता, लहान मुलं-मुली, किशोरवयीन मुलं, वृद्ध या सर्वांनीच पोषक आणि परिपूर्ण आहारासह सुरक्षित आणि स्वच्छ अन्न ग्रहण करणे आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे
– कमीत कमी प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ निवडा.
– पॅकेजिंग फूड खाताना त्यावरील अन्नघटक, शरीराला हानिकारक असणारे घटक किती प्रमाणात आहेत? हे तपासा.
– वजन नियंत्रणासाठी प्रथिने पूरक आहार टाळा
– मीठ, तेल आणि चरबीयुक्त पदार्थांचं प्रमाण कमी ठेवा
– अल्ट्रा प्रोसेस्ट पदार्थांचे सेवन कमी करा.

साखर आणि फुड सप्लिमेंट्स टाळा…

दोन वर्षापर्यंतच्या वयापर्यंत लहान मुलांना साखर न देण्याचा आवाहन करण्यात आलं आहे. तसेच तरुण वयात देखील जास्त साखरेचे सेवन केल्याने दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच साखर युक्त पदार्थ हे कमी पोषणमूल्य देणारे आणि शारीरिक समस्या निर्माण करणारे ठरू शकतात. त्यामुळे लहानपणापासूनच निरोगी खाण्याच्या सवयी असणे गरजेचे आहे. यामध्ये फळभाज्या संपूर्ण धान्य यासारख्या पौष्टिक पदार्थांना प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच शरीराला आवश्यक असणारे प्रथिन मिळवण्यासाठी अनेकदा जास्तीत जास्त प्रथिन युक्त आहार किंवा सप्लीमेंट्स घेतले जातात त्याचा वापर देखील कमी करणे गरजेचे असल्याचं या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या