घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या खताळांची दुटप्पी भूमिका… घरातच दिली उमेदवारी
Amol Khatal : विधानसभा निवडणुकीमध्ये घराणेशाहीच्या मुद्यावरून संगमनेरमध्ये चांगलेच राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
Amol Khatal : विधानसभा निवडणुकीमध्ये घराणेशाहीच्या मुद्यावरून संगमनेरमध्ये चांगलेच राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर घराणेशाहीची टीका करणारे अमोल खताळ यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याच घरात उमेदवारी दिल्याने टीकेची धनी बनले आहे. खताळांनी आपल्या भावाच्या पत्नी सुवर्णा खताळ यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. विधानसभा निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी महिलांनी निडर होऊन खताळ यांचे काम केले. मात्र, सर्वांना डावलून नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा खताळ यांना उमेदवारी दिल्याने आ. खताळ हे घराणेशाहीत अडकले असल्याची चर्चा होत असुन महायुतीतील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच घराणेशाही विरोधात आक्रमक असलेल्या खताळ यांची दुटप्पी भूमिका कार्यकर्त्यांच्या पचनी पडेना असे चित्र सध्या पाहायला मिळते आहे.
घराणेशाहीवरुन थोरातांना घेरणाऱ्या खताळांचे पाऊल चुकले
2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेरमध्ये महायुतीकडून अमोल खताळ तर महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना उमेदवारी देण्यात आली. प्रस्थातपितांविरोधात सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा अशी टॅगलाईन या निवडणुकीला देण्यात आली. संगमनेर आणि बाळासाहेब थोरात हे एक समीकरण आहे. गेल्या आठ टर्मपासून ते इथे जिंकत आले आहेत. मात्र, एका नवख्या उमेदवाराने थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावला. खताळ यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आक्रमक होत थेट जाहीर भाषणांमध्ये थोरात यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यामुळे संगमनेरकरांनी देखील खताळ यांना संधी देत मतदारसंघात परिवर्तन घडवून आणले. त्यांनतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार असून आता उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचे उमेवारांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली आहे. खताळ यांनी आपल्या घरातच म्हणजेच वाहिनी सुवर्णा खताळ यांना उमेदवारी देत घराणेशाहीकडे वाटचाल सुरु केली. यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये खताळ यांच्यासाठी काम करणारे कार्यकर्त्यांच्या पदरी मात्र निराशा पडल्याचे चित्र मतदार संघात दिसते आहे.
नगराध्यक्षपद! पत्नी विरुद्ध वाहिनी
संगमनेर नगरपालिका निवडणुकीत महायुतीला टक्कर देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी ‘संगमनेर सेवा समिती’ या पॅनलखाली निवडणुकीची रणनीती आखली आहे. संगमनेर सेवा समितीकडून नगराध्यक्षपदासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेनेच्या नगराध्यक्षपदासाठी आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा संदीप खताळ यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र घराणेशाहीला विरोध करणारे खताळ यांनी घरातच उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे.
नगराध्यक्षांची निवडणुक! आमदारांची प्रतिष्ठा पणाला
संगमनेरमध्ये आता विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे एका बाजूला, तर महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ दुसऱ्या बाजूला रिंगणात उतरत असल्याने या दोन्ही आमदारांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे याही निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
बाळराजे राजकारणात लहान, मी अजितदादांची माफी मागतो, राजन पाटलांकडून दिलगिरी व्यक्त
दरम्यान तांबे यांनी विकासच व्हिजन कस असावं याच लेखाजोखा मांडत या निवडणुकीत सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचे देखील पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे शिवसैनिकांची नाराजी यामुळे खताळ यांच्या अडचणीत भर पडणार असं चित्र सध्या संगमनेरात दिसते आहे.
