सावधान! निपाह व्हायरस कोरोना संसर्गापेक्षाही घातक, ICMR चा धोक्याचा इशारा

  • Written By: Published:
सावधान! निपाह व्हायरस कोरोना संसर्गापेक्षाही घातक, ICMR चा धोक्याचा इशारा

Nipah virus Updates : कोरोना विषाणू अद्याप जगातून पूर्णपणे गेलेला नसताना, निपाह व्हायरसने (Nipah virus) जगभरात खळबळ उडवून दिली आहे. केरळमध्ये या विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. केरळमधील अनेक लोक या आजाराचे बळी ठरले आहेत. निपाह व्हायरस हा कोरोना पेक्षा जास्त धोकादायक आहे. कारण, यावर अद्याप कोणताही इलाज नाही. निपाह व्हायरसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) देखील याबाबत सतर्क झाली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी परिस्थितीचा आढावा घेतला. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही घातक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण केवळ दोन ते तीन टक्के आहे, परंतु निपाह व्हायरसमुळे मृत्यूचे प्रमाण 40-70 टक्के आहे.

भारत ऑस्ट्रेलियाकडून आणखी 20 डोस खरेदी करणार आहे

ते म्हणाले की, भारतात निपाह व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. राजीव बहल यांनी सांगितले की, 2018 आणि 2019 मध्येही या व्हायरसचे रुग्ण आढळले होते. 2018 मध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे काही डोस मिळाले होते. तथापि, त्याचा डोस सध्या 10 रुग्णांसाठी उपलब्ध आहे. निपाह व्हायरस संसर्गाच्या उपचारासाठी भारत ऑस्ट्रेलियाकडून आणखी 20 डोस खरेदी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी सांगितले की भारतात अद्याप कोणालाही त्याचा डोस दिलेला नाही.

VSI च्या बैठकीला अजितदादांची दांडी, पवारांच्या पुढं येणं टाळलं; वडेट्टीवार म्हणाले, ‘अजित पवारांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा…’ 

व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जाताहेत

राजीव बहल यांच्या म्हणण्यानुसार, निहापचे औषध सुरुवातीच्या काळात रुग्णांना द्यावे लागते. ते म्हणाले की केरळमध्ये व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. केरळमध्ये त्याची प्रकरणे नोंदवली जात असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की येथे प्रकरणे का येत आहेत हे आम्हाला माहित नाही.

केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे दोघांचा मृत्यू
अधिकाऱ्यांनी सांगितले की, निपाह व्हायरसमुळं लागण झालेले ९ वर्षांचे बालक व्हेंटिलेटरवर आहे. त्यांच्याशिवाय इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सध्या केरळमध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या चार झाली आहे, त्यानंतर राज्य सरकारने संक्रमित व्यक्तींच्या संपर्क यादीत असलेल्या सर्वांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री जॉर्ज म्हणाले की, संक्रमित व्यक्तीच्या नमुन्याची चाचणी सकारात्मक आल्यानंतर निपाह विषाणूची पुष्टी झाली, त्यामुळे राज्यातील एकूण संक्रमित लोकांची संख्या सहा झाली आहे, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसमुळं मृत्यूचं प्रमाणे हे अधिक असल्यानं नागरिकांची धाकधूक वाढली आहे.

आजाराची लक्षणे कोणती ?
निपाहाची बाधा झाल्यावर एक-दोन दिवसांतच त्याची लक्षणे दिसतात.
सुरूवातीला रुग्णाला तीव्र ताप येतो.
अंगदुखी, घसा खवखवणे, श्वास घेण्यास अडचण आणि उलटी होणे लक्षणे
याशिवाय, रुग्णांना न्यूमोनिया होऊ शकतो.
आजाराची तीव्रता वाढल्यास एन्सेफेलायटिस सारख्या विकारांची लागण होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube