VSI च्या बैठकीला अजितदादांची दांडी, पवारांच्या पुढं येणं टाळलं; वडेट्टीवार म्हणाले, ‘अजित पवारांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा…’

  • Written By: Published:
VSI च्या बैठकीला अजितदादांची दांडी, पवारांच्या पुढं येणं टाळलं; वडेट्टीवार म्हणाले, ‘अजित पवारांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा…’

Vijay Vadettiwar On Ajit Pawar : राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) संचालक मंडळाच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी पुन्हा एकत्रित येतील, अशी चर्चा होती. मात्र, अजित पवार यांनी या बैठकीला दांडी मारत शरद पवारांच्या पुढं येणं टाळलं आहे. अजित पवार यांनी जाणीवपूर्वक शरद पवारांसमोर येणे टाळल्याची जोरदार चर्चा होत आहे. यावर विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा दिसत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट गव्हर्निंग बोर्डाची बैठक आज (१५ सप्टेंबर) पुण्यात झाली आहे. या बैठकीला शरद पवार, दिलीप वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे यांच्यासह अन्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार होते. मात्र, अजित पवारांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. यावर बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, आता तरी न्यायालयीन लढ्यावरून आणि निवडणूक आयोगाच्या पत्रांवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता दोघांच्याही दृष्टीने ही अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळं त्या दोघांना एकमेकांसमोर तोंड दाखवणं शक्य नसेल. म्हणून अजित पवार शरद पवारांच्या बैठकीला जाणं टाळत असावेत, असं वडेट्टीवार म्हणाले.

संजय राऊत पिंजऱ्यातला पोपट, मालक आला की टिव टिव करतो; रावसाहेब दानवेंची सडकून टीका

डेट्टीवार म्हणाले की,अजित पवार म्हणाले होते की, आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत. मात्र, ते शरद पवारांच्या मागून जातात. पुढून जत नाहीत, हे मागच्या बैठकीत बघितलं. कदाचित त्यांच्यात शरद पवारांच्या समोरून जाण्याची हिंमत नसेल. म्हणूनच ते शरद पवार हजर असलेल्या बैठकीला हजर राहणं टाळत असावे.

ते म्हणाले, माणसाला अपराधीपणाची भावना वाटत असली की, तो नजरेला नजर मिळवू शकत नाही. तोच अपराधीपणा अजित पवार यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि वागण्यातही दिसत आहे, असं वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

दरम्यान, अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्तपणे भेट घेतली होती. मात्र फुटीनंतर सार्वजनिकरित्या दोघेही एकत्र आले नव्हते. मात्र, आजच्या बैठकीसाठी तरी हे दोन्ही गटाचे प्रमुख एकत्रित येतील अशी शक्यता प्रसारमाध्यमांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र अजित पवार यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. आता वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार गट काय प्रत्युत्तर देतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube