Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या (Lok Sabha Election) प्रचाराने वेग घेतला आहे. राजकारण म्हटलं की एकाच घरात परस्पर विरोधी पक्षांचे समर्थक असतात. असाच प्रकार केरळमध्ये घडला आहे. मुलगा भाजपाचा उमेदवार आहे तर वडील काँग्रेसमधील मातब्बर नेते. इतकेच नाही तर त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रिपद सुद्धा सांभाळले आहे. हे नेते म्हणजे माजी संरक्षण मंत्री एके अँटनी.
याच ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी भारतीय (Anil Antony) जनता पार्टीच्या तिकिटावर पथनमथिट्टा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी मागील वर्षीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. अनिल अँटनी यांच्या विरोधात काँग्रेसने अँटो अँटनी यांना उमेदवारी दिली आहे. आता एके अँटनी मुलाच्या विरोधात प्रचार करत आहेत. एके अँटनी म्हणाले, की काँग्रेस विरोधात लढणाऱ्या भाजपाचा पराभव झाला पाहिजे. माझ्या मुलाच्या जागी काँग्रेस उमेदवार अँटो अँटनी विजयी झाले पाहिजेत. अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश करून मोठी चूक केली आहे.
अनिल अँटनी यांनी मागील वर्षीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर भाजपने त्यांना यंदा लोकसभा निवडणुकीत तिकीट दिले आहे. या मतदारसंघात काँग्रेसने अँटो अँटनी यांना तर सीपीआय (एम) ने थॉमस इसाक यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेस उमेदवार अँटो अँटनी या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी 44 हजार मतांपेक्षा जास्त मते घेत विजय मिळवला होता. भाजप उमेदवार के. सुरेंद्रन तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांना जवळपास तीन लाख मते मिळाली होती.