नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाकडून खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अदानी (Adani) मुद्द्यावरून विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याच्या सांगण्यात येत आहे. तर 15 फेब्रुवारीपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्याच्या सूचनाही खासदार राहुल गांधी यांना देण्यात आल्या आहेत.
राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून लोकसभेमध्ये ज्याप्रकारे वक्तव्य केलं. अशा पद्धतीचे वक्तव्य करताना ऑथेंटीक करण्यात यावीत असा आरोप करत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) आणि भाजपचे खासदार दुबे (dubey) यांनी ही नोटीस बजावली आहे.
या नोटिशीला उत्तर देण्यासाठी खासदार राहुल गांधी यांना 15 फेब्रुवारीपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. पण जर त्यांनी या नोटिशीला उत्तर दिले नाही तर त्यांना प्रक्रियेनुसार समिती चौकशीला देखील बोलावू शकते. त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई होऊ शकणार आहे. त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. की, खासदार राहुल गांधी काय उत्तर देतात आणि त्यांच्यावर काय कारवाई होते.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) व केंद्र सरकारवर (Central Govt) जोरदार निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध निर्णयांवरुन मोदींवर टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी नुकताच हिंडेनबर्ग या संस्थेने उद्योगपती अंदानींवर जो आरोप केला आहे, त्यावरुन निशाणा साधला.
याविषयावरबोलत असताना त्यांनी संसदेमध्ये अदानी (Adani) व मोदी यांचे फोटो दाखवत या दोघांचे संबंध काय ? असेही विचारले. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या कोळश्याच्या खाणीवरुनही त्यांनी मोदी व अदानींच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी राहुल गांधी हे संसदेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर बोलत होते.
Sharad Pawar : सरकारकडून सत्तेचा गैरवापर, संधी आल्यावर जागा दाखवा
तसेच जीव्हीकेवर दबाव टाकून त्यांनी मुंबई विमानतळाचे काम हे अदानींना दिल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी नियम बदलून अदानींना 6 एअरपोर्ट दिले असून या कामात सीबीआय व ईडीचा वापर करुन जीव्हीकेवर दबाव टाकला. अदानी हे 2014 साली संपत्तीच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर होते. काही वर्षातचे ते दुसऱ्या क्रमांकावर आले, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
अदानी व मोदी यांनी गेल्या आठ वर्षात किती वेळा एकत्र प्रवास केला ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. अदानींची गेल्या आठ वर्षातील संपत्ती वाढ होण्यामध्ये मोदी व केंद्र सरकारचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर आता या प्रकरणी लोकसभा सचिवालयाकडून खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस बजावण्यात आली आहे.