Download App

Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षेत कुचराई प्रकरणी मोठी कारवाई; 7 कर्मचारी निलंबित

  • Written By: Last Updated:

Parliament Security Breach Seven Persons Suspended : संसदेच्या सभागृहात काल (दि.13) झालेल्या सुरक्षेतील कुचराई प्रकरणी अखेर लोकसभा सचिवायलयाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षेतील (Loksabha Security) त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. तर, दुसरीकडे संसदेत आणि संसदेच्या बाहेर घोषणा देणाऱ्यांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिल्ली पोलीस स्पेशल सेल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

आरोपी एकमेकांच्या ओळखीचे होते 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी एकमेकांना आधीच ओळखत होते. संसदेच्या आत आणि संसदेबाहेरील लोकांचा उद्देश एकच होता. हे सर्व आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर त्यांनी एक योजना आखली. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींची नावे मनोरंजन आणि सागर शर्मा अशी आहेत. मनोरंजन हा म्हैसूरचा रहिवासी आहे. संसदेबाहेरील आंदोलनात अटक करण्यात आलेल्या या दोघांकडे आधारकार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र नव्हते. आपण कोणत्याही संघटनेशी संबंधित नसल्याचं त्यांनी म्हटले आहे, ते स्वतःहून संसदेत आले आहेत. त्यांच्या चौकशीसाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

Smoke Bomb : संसदेवर ‘गॅस’अ‍ॅटॅक? सभागृहात धुरच धुर करणारा ‘स्मोक बॉम्ब’ म्हणजे काय?

संसदेत धूर करून ‘तानाशाही नहीं चलेगी’ म्हणणारे चौघं कोण?

अमोल शिंदे : संसदेच्या सभागृहात स्मोक बॉम्बद्वारे धुर फेकल्याची घटना घडत असतानाच संसदेच्या बाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी करताना अमोल शिंदेला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला अमोल महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असून त्याने ‘तानाशाही नहीं चलेगी, भारत माता की जय, जय भीम और जय भारत’ च्या घोषणा दिल्या.

नीलम : अमोलसह संसदेच्याबाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी करताना नीलम नावाच्या मुलीलाही पोलिसांनी अटक केली आहे. नीलम हरयाणातील असून तिच्या वडिलांचं मिठाईचं दुकान आहे. मागील अनेक वर्षांपासून नीलम विविध आंदोलनामध्ये सक्रिय असून, नीलमनेही अमोल शिंदेसोबत ‘तानाशाही नहीं चलेगी, भारत माता की जय, जय भीम और जय भारत’ च्या घोषणा दिल्या.

‘सागर’ने स्मोक बॉम्बसह उडी मारली त्या प्रेक्षक गॅलरीची उंची नेमकी किती?

सागर शर्मा : सागर शर्मा हा उत्तर प्रदेशातील लखनऊमधील रहिवासी असून सागर आणि मनोरंजन हे दोघे संसदेच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये होते. संसदेचं कामकाज सुरु असतानाच दोघांनीही प्रेक्षक गॅलरीमधून उडी घेतली. उडी घेतल्यानंतर आपल्या बुटात लपवलेल्या स्मोक बॉम्बद्वारे त्यांनी संसदेच्या सभागृहात धुर फेकला. त्यामुळे सभागृहात खळबळ माजली होती.

मनोरंजन :
सागर शर्मासोबत संसदेत उपस्थित असलेला मनोरंजन हा कर्नाटकातील असून तो पेशाने एक रिक्षाचालक आहे. मागील अनेक वर्षांपासून मनोरंजन रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहे. विविध आंदोलनामध्ये त्याचा सहभाग राहिला असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

Tags

follow us