सोशल मीडियावर मैत्री, पाससाठी 180 दिवसांपासून संसदेच्या फेऱ्या, पोलिस तपासात माहिती समोर

  • Written By: Published:
सोशल मीडियावर मैत्री, पाससाठी 180 दिवसांपासून संसदेच्या फेऱ्या, पोलिस तपासात माहिती समोर

Parliament Security Breach : संसदेच्या (Parliament) सुरक्षा भंग प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

‘बीड जाळपोळ छगन भुजबळांनीच घडवून आणलायं’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप 

आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन व्यक्तींनी सुरक्षा व्यवस्थेला बगल देत प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. त्यांनी सभागृहात स्मोक बॉम्ब फेकून धुर केला. दरम्यान, त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी एका तरुण आणि तरुणीने बाहेर आंदोलन केले, त्यांनाही ताब्यात घेण्यात आले, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. मात्र, या घटनेमुळे लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची टीका होत आहे.

म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिन्हा यांच्या व्हिजिटर पासवर तरुणांनी संसदेत प्रवेश केला, हे आता समोर आलं. याप्रकरणी खासदार प्रताप सिन्हा यांचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, संसद सुरक्षा भंग प्रकरणात एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोघे फरार असून त्यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

‘ओबीसी नेत्यांना नाव ठेवणार नाही ‘हा’ एकच बोलतोयं’; जरांगेंकडून भुजबळांचा पुन्हा एकेरी उल्लेख 

विशेष म्हणजे यातील एक आरोपी मनोरंजनाचा पास मिळवण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून संसद परिसरात चकरा मारत होता. या सर्व आरोपींच्या घुसखोरीमागचा खरा हेतू काय होता, याचा पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेले चार आरोपी गुरुग्रामच्या सेक्टर 7 मध्ये असलेल्या हाउसिंग बोर्डमध्ये राहत होते. या प्रकरणी विकी शर्मा आणि त्याच्या पत्नीला हिस्सार येथून अटक करण्यात आली आहे. हे चौघे विक्की शर्माच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी एकमेकांना आधीच ओळखत होते. संसदेच्या आत आणि संसदेबाहेरील लोकांचा उद्देश एकच होता. हे सर्व आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर त्यांनी एक योजना आखली. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींची नावे मनोरंजन आणि सागर शर्मा अशी आहेत. मनोरंजन हा म्हैसूरचा रहिवासी आहे. संसदेबाहेर अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अमोल शिंदे असून नीलम असे तरुणीचे नाव आहे. अमोल शिंदे महाराष्ट्रात तर नीलम हिस्सारमधील रहिवाशी आहे. या दोघांकडे आधारकार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र नव्हते. आपण कोणत्याही संघटनेशी संबंधित नसल्याचं त्यांनी म्हटले आहे, ते स्वतःहून संसदेत आले आहेत. त्यांच्या चौकशीसाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

नीलमच्या कुटुंबाला या घटनेत नीलमचा सहभाग असल्याची माहिती मिळताच मोठा धक्का बसला आहे. नीलमच्या भावाने सांगितले की, ही घटना मी पुरता हैराण झालो आहे. नीलम ही माझी मोठी बहीण असून ती दिल्लीत गेल्याचं आम्हाला माहिती नव्हतं. ती हिस्सारमध्ये शिकत होती, असं तिच्या भावाने सांगितले. नीलमने बीए, एमए, बीएड आणि कॅट परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. आपली बहिणी नेहमीच बेरोजगारीच्या प्रश्नावर आवाज उठवत होती. शेतकरी आंदोलनातही तिचा सहभाग होता. ती गेल्या 5 महिन्यांपासून हिस्सारमध्ये राहत होती, मात्र ती दिल्लीला कधी आणि का गेली हे आम्हाला माहिती नाही, असं नीलमच्या भावाने सांगितलं.

माझ्या मुलाला फाशी द्या-
आपल्या मुलाचा कारनामा कळताच मनोरंजनच्या वडिलांनी मुलाच्या कृत्याचा निषेध केला आणि असे घडू नये असे म्हटले. त्यांनी सांगितले की, मनोरंजनने बीईचे शिक्षण घेतले आहे. एचडी देवेगौडा यांच्यामुळेच मुलाला इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला होता. तो नेहमी दिल्लीला जात असे. मात्र, त्याने हे केलं आम्हाला माहिती नाही. त्यांचे कृत्य चुकीचे आहे, कोणीही असे करू नये.
माझ्या मुलाने काही चांगले केले असते तर मी नक्कीच त्याला पाठिंबा दिला असता. मात्र, त्याचे हे कृत्य चुकीचे असून मी त्याचा निषेध करतो. त्याला फाशी द्यावी, असं ते म्हणाले.

पोलिस तपासात अमोल शिंदे सकारात्मक उत्तरे देत नसल्याचेही समोर आले आहे. आज आरोपींची चौकशी होणार असून गुरुवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube