लोकसभा अध्यक्ष अडचणीत? विरोधी पक्षांनी आखली ‘ही’ रणनीती

नवी दिल्ली : विरोधी पक्ष लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) ओम बिर्ला (Om Birla) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव (No confidence Motion) आणू शकतात. काँग्रेस खासदारांच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यासंदर्भात काँग्रेस इतर विरोधी पक्षांशी चर्चा करत आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यांनतर काँग्रेससह संपूर्ण विरोधक आक्रमक झाले आहे. […]

Untitled Design   2023 03 28T183934.426

Untitled Design 2023 03 28T183934.426

नवी दिल्ली : विरोधी पक्ष लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) ओम बिर्ला (Om Birla) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव (No confidence Motion) आणू शकतात. काँग्रेस खासदारांच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यासंदर्भात काँग्रेस इतर विरोधी पक्षांशी चर्चा करत आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यांनतर काँग्रेससह संपूर्ण विरोधक आक्रमक झाले आहे. यातच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत विरोधक आहे. यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सभागृहातील पक्षपाती वृत्तीमुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव सोमवारी लोकसभेत मांडला जाण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेस खासदारांच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यासंदर्भात काँग्रेस इतर विरोधी पक्षांशी चर्चा करत आहे. सर्वांशी चर्चा झाल्यांनतर निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत तृणमूलसह इतर पक्ष सहभागी झाले होते. मात्र या बैठकीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच महाविकास आघाडीचे घटक असलेले उद्धव ठाकरे यांच्या गटाने बहिष्कार टाकला. मात्र या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

लोकसभेचे कामकाज 11 व्या दिवशीही ठप्प
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस सदस्यांनी काळे कपडे घालत खालच्या सभागृहात गोंधळ घातला. गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेसच्या काही खासदारांनी कागद फाडून सभापतींच्या दिशेने फेकले तर एका सदस्याने सभापतींसमोर काळे कापड ठेवण्याचा प्रयत्नही केला.

मोठी बातमी! आधार-पॅन कार्ड लिंकिंगबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

विरोधकांकडून केंद्राला कोंडीत पकडण्याचा डाव
राहुल यांच्या अपात्रतेप्रकरणी विरोधकांकडून केंद्राला कोंडीत पकडण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत सरकारी बंगला रिकामा करण्याच्या आदेशाबाबत राहुल गांधींना मिळालेल्या पत्रावरही चर्चा झाली. यावर सर्व सदस्यांनी सांगितले की, या आदेशाने काही फरक पडत नाही, कारण आता काँग्रेसला राहुल गांधींना कायदेशीर दरवाजा ठोठावावा लागणार आहे.

Exit mobile version