Download App

Jyotiraditya Scindia : भाजप खासदाराने मंत्र्यांना सुनावले.. म्हणाले, ‘माझी हात जोडून विनंती की…’

नवी दिल्ली : लडाखचे खासदार जाम्यांग नामग्याल (Jamyang Namgyal) यांनी लोकसभेत (Lok Sabha) केलेल्या भाषणात लडाखमधील (Ladakh) समस्यांचा पाढाच वाचला. जाम्यांग यांनी लोकसभेत सरकारकडे (Jyotiraditya Scindia) मागणी केली की लडाखमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. उड्डाणेही रद्द झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विमानतळावर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे.

नामग्याल आपल्या भाषणात म्हणाले, लडाख हा बर्फाळ प्रदेश आहे. विशेषकरुन थंडीच्या काळात या भागातून जाणारे श्रीनगर आणि मनाली दोन्ही राष्ट्रीय हायवे बर्फवृष्टीमुळे बंद होतात. अशावेळी फक्त हवाईवाहतूक हाच पर्याय आमच्यासमोर असतो. हा पर्याय निवडणे आमची मजबूरी असते. अशावेळी विद्यार्थींना, रुग्णांना आणि वयोवृद्ध व्यक्तींना देखील हवाईवाहतुकीचा वापर करावा लागतो. आमच्याकडे या दुसरी कोणतीही सुविधा नसते, असे नामग्याल म्हणाले.

वातावरण खराब असेल किंवा टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा लडाखचे विमानतळ छोटे असल्याने विमानांची उड्डाणे सतत्याने रद्द होत आहेत. खासगी विमान कंपन्या सुविधा पुरवत नसल्याने लडाखमधील हजारोंच्या संख्येने गरीब लोक दिल्ली, चंदीगड, जम्मू, श्रीनगर मधील भागात अडकून पडतात. विमान कंपन्याच्या कर्मचारी सहकार्य करीत नसल्याने विद्यार्थ्यी, रुग्ण आणि गरीब लोकांना मोठ्या अडचणी येतात, असे नामग्याल यांनी सांगितले.

भाजपमध्ये घराणेशाही आहे का, या प्रश्नांवर काय म्हणाले अमित शहा?

माझी सरकारला विनंती आहे की वातावरण खराब असल्याने उड्डाणे रद्द झाली तर आम्ही समजू शकतो. पण प्रवाशांना चांगली वागणूक द्यावी, लवकरात लवकर अतिरिक्त फ्लाईटची व्यवस्था करावी. काही विमान कंपन्या अडचणीच्या काळात प्रवाशांचा फायदा घेतात. तिकीटाचे दर वाढवतात. वीस हजारापासून ते पन्नास हजारापर्यंत त्यांचे दर आहेत, असा आरोप नामग्याल यांनी विमान कंपन्यांवर केला आहे.

Tags

follow us