Download App

कॉंग्रेसला बालेकिल्ल्यात रोखण्यास भाजप सज्ज; रायबरेलीतून नुपूर शर्मांना देणार उमेदवारी?

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) देशांमध्ये एकीकडे सत्ताधारी भाजप तर दुसरीकडे विरोधी पक्षातील काँग्रेस जोरदार तयारीला लागले आहेत. त्यात आता काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील रायबरेली या मतदारसंघात भाजपकडून काँग्रेसला जोरदार टक्कर देण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी भाजपकडून नुपूर शर्मा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Mahesh Manjarekar यांचा ‘जुनं फर्निचर’ लवकरच येणार; दणक्यात पार पडला टिझर लाँच!

भाजपच्या उत्तर प्रदेशातील उमेदवारांच्या यादीबद्दल बोलायचं झालं तर उत्तर प्रदेशातील आतापर्यंत 51 जागांवरील भाजपचे उमेदवार निश्चित झाले आहे. मात्र अध्यापही 24 जागांवरील उमेदवारांचे नाव तिची घोषणा होणं बाकी आहे. त्यातील रायबरेली या ठिकाणी नुपूर शर्मा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. मात्र यावर अद्याप भाजपकडून कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेले नाही.

Praniti Shinde यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुशीलकुमार शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले आमच्या मनात…

दरम्यान रायबरेली लोकसभा मतदारसंघ हा गांधी परिवाराचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. सोनिया गांधी गेल्यावेळी याच मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणुकीमध्ये उतरण्यास नकार दिला असून सध्या त्या राजस्थानातून राज्यसभेवर खासदार आहेत.

प्रदीप शर्मा यांचेच ‘एन्काउंटर’; अंडरवर्ल्डचा कर्दनकाळ ते जन्मठेपेची शिक्षा

तसेच सोनिया गांधी यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसकडून देखील या ठिकाणी कोणता उमेदवार असणार? हे निश्चित झालेले नाही. मात्र पक्षाकडून प्रियंका गांधी वाड्रा यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी. अशी मागणी करण्यात येत असल्याचे देखील बोलले जात आहे. जेणेकरून उत्तर प्रदेशात काँग्रेसला मजबूत केले जाईल.

त्यामुळे एकीकडे काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी जर रायबरेली या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर भाजपचा त्यांच्या विरोधातील उमेदवार कोण असणर या वरील चर्चांना उधान आलय त्यामध्ये भाजप एखादा हाय प्रोफाईल नेता प्रियांकांना टक्कर देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतो. त्यामध्ये नुपूर शर्मा यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. त्याचबरोबर अगोदर समाजवादी पार्टीमध्ये असलेले आमदार मनोज पांडे त्यांना देखील भाजपकडून रायबरेली मतदारसंघात उमेदवारी गिरवण्याची शक्यता बोलली जात आहे.

follow us