Loksabha Election 2024: माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार ? पवार लेकीची जागा सेफ करणार

  • Written By: Published:
Loksabha Election 2024: माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार ? पवार लेकीची जागा सेफ करणार

Madha Lok Sabha constituency to Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आता काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष होणार हे आतातरी निश्चित आहे. बारामतील लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे वर्चस्व दिसत आहे. तसेच भाजप व शिंदे गटाची ताकद आहे. त्यामुळे या मतदारसंघात शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यासाठी आता शरद पवार जातीचे समीकरणही खेळतील असे आता दिसून लागले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना माढा लोकसभा जागा (Madha LokSabha constituency) देण्याचा विचार शरद पवार यांचा आहे. महादेव जानकर यांना ही जागा दिल्यानंतर बारामती सुप्रिया सुळे यांना सोपे जाऊ शकते, याचे त्यामागे कारण सांगितले जात आहे.

Sunil Deodhar: पुण्याच्या स्थानिक प्रश्नांचे योग्य व सर्वंकष निराकरण होईल, यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणार

महादेव जानकर हे परभणी आणि माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची चाचपणी करत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे काही नेतेही जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून रासपची माढा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात तयारी सुरू आहे. महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. या मतदारसंघात धनगर समाज बहुसंख्येने मतदार आहेत. ही जमेची बाजू आहे. या मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर हे भाजपचे खासदार आहेत. जानकर हे सध्या तरी महायुतीमध्ये आहेत. परंतु ही जागा त्यांना मिळण्याची परिस्थिती नाही. तर जानकर हे सत्ताधाऱ्यांविरोधात अनेकदा बोलताना दिसत आहेत. त्यामुळे ते एेनवेळी महाविकास आघाडीत जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

नितीश कुमारांना महाराष्ट्रात धक्का! कपिल पाटलांकडून ‘समाजवादी गणराज्य पक्षाची घोषणा

त्याता आता शरद पवार हे लेक सुप्रिया सुळे यांच्यासाठी सेफ गेम खेळण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीत माढाची जागा ही शरद पवार गटाला आहे. शरद पवार हे येथून 2009 मध्ये खासदार झाले आहेत. तर माढा व बारामती मतदारसंघातील जातीय समीकरणाचा विचार करून ही जागा शरद पवार हे महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी तशी ‘हिंट’च पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

माढाची जागा जानकर यांना दिल्यानंतर बारामती लोकसभेची गणितही सोपे होईल. कारण बारामती मतदारसंघातील इंदापूर, बारामती, दौंड या भागात धनगर समाजाचे एकगठ्ठा मतदान आहे. माढाची जागा ही जानकरांना सोडल्यानंतर बारामतीतीमधील धनगर मतदार हे सुप्रिया सुळे यांना साथ देतील, असा राजकीय कयास त्यामागे दिसून येत आहे. यावर जानकर यांनी मात्र अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. जानकर यांच्या भूमिकेनंतर पुढील राजकीय गणिते स्पष्ट होणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज