महादेव जानकर अन् उद्धव ठाकरेंचा एकत्र येण्याचा प्लॅन? परभणीत बंडू जाधवांचे तिकीट संकटात
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याबाबत अजून काही ठरलेले नाही. पण त्यांनी जर परभणीची (Parbhani Lok Sabha constituency) जागा आमच्यासाठी सोडली तर मी त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार आहे, तशी त्यांना ऑफरही दिली आहे, असा मोठा दावा असा मोठा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar ) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला. ते मुंबईमध्ये मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनापूर्वी बोलत होते.
महादेव जानकर म्हणाले, मी परभणी आणि माढा लोकसभा मतदारसंघात माझी 100 टक्के यंत्रणा उभी राहिली आहे. दोन्ही मतदारसंघांशी माझे घट्ट नाते तयार झाले आहे. दोन्ही पैकी शेवटच्या दिवशी एका ठिकाणी उभे राहण्याचा निर्णय घेणार आहे. पण अद्याप महायुती की महाविकास आघाडी अजून असे काही ठरलेले नाही. मी राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून स्वतंत्रच चाललो आहे. (Mahadev Jankar has demanded that Uddhav Thackeray should leave the Parbhani Lok Sabha constituency to the Rashtriya Samaj Party.)
पेमेंट सेवा सुरु ठेवण्यासाठी Paytm ची धडपड; Axis Bank ठरणार तारणहार!
माझ्या आणि शरद पवार यांच्यासोबत दोन बैठका झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबतही दोन बैठका झाल्या आहेत. अद्याप दोघांकडूनही काही आलेले नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याबाबत अजून काही ठरलेले नाही. त्यांनी माझी ऑफर स्वीकारली तर मी त्यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार आहे. आमची मत आहे की, उद्धव ठाकरे यांनी परभणीची जागा सोडावी, मी त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार आहे, असे जानकर यांनी सांगितले.
कायद्याच्या चौकटीतील ‘मराठा’ आरक्षण कसे देणार? विशेष अधिवेशनापूर्वी ‘मविआ’ CM शिंदेंना पत्र
परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला :
परभणीमध्ये सर्वपक्षीयांची ताकद असली तरीही लोकसभा मतदारसंघावर मागील तीन दशकांपासून शिवसेनेचा भगवा फडकतो आहे. काँग्रेस आणि शेकापचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ 1989 मध्ये मराठवाड्यातील भावनिक वातावरणाचा फायदा घेत शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्याकडे घेतला. त्यानंतर 1998 ला काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांचा अपवाद वगळता सातत्याने हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडेच ठेवला आहे. सध्या शिवसेना (Uddhav Thackeray) संजय जाधव (Sanjay Jadhav) इथून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आता ठाकरे आपल्या बालेकिल्ल्याबाबतच दिलेल्या ऑफरवर काय विचार करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.