Download App

Lok Sabha Election 2024: अखेर जेडीएसची भाजपबरोबर युती ! लोकसभा निवडणूक एकत्र लढणार

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दक्षिणेतील राज्यातून एक साथीदार आज मिळाला आहे. कर्नाटकातील जेडीएस (JDS) हा प्रादेशिक पक्ष भाजपच्या (bjp) नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीत सहभागी झाला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीविरुद्ध लढण्यासाठी एनडीएला बळ मिळाले आहे. जेडीएसचे प्रमुख व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर जेपी नड्डा यांनी यांनी जेडीएस हा पक्ष एनडीएमध्ये महाआघाडीत सहभागी होत असल्याचे जाहीर केले आहे.

Sunil Shelke : ‘…तेव्हा भाजपसोबत जाण्यास रोहित पवार तयार होते’; अजितदादा गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि एचडी कुमारस्वामी यांच्यात बैठक झाली.त्यानंतर जेडीएसने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला.त्यांचे एनडीएमध्ये आम्ही स्वागत करत आहोत. या पक्षाच्या सहभागामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे न्यू इंडिया, स्ट्रॉंग इंडियाचे मिशन आणखी मजबूत होईल, असेही नड्डा यांनी जाहीर केले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप व जेडीएसला मतदारांनी नाकारले आहे. दक्षिणेकडील एकमेव कर्नाटक राज्य भाजपच्या ताब्यात होते.हे राज्य ताब्यातून गेल्याने भाजपच्या दक्षिण मोहिमेला धक्का बसला आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएसबरोबर भाजपने युती केली आहे. लोकसभेच्या दृष्टीने हे राज्य भाजपसाठी महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु लोकसभेची किती जागा कोणत्या पक्ष लढणार आहे,याबाबत मात्र दोन्ही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.


दिल्ली दौऱ्यात ठरवली नार्वेकरांनी रणनीती; आता ‘या’ दिवशी होणार आमदार अपात्रतेची सुनावणी

आता केवळ भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत येण्याबाबत निर्णय झालेला आहे.आता केवळ प्राथमिक चर्चा झालेली आहे. जागा वाटप व इतर मुद्द्यानंतर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असेही कुमारस्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कर्नाटकातील भाजपच्या नेत्याने जागा वाटपही केले

जेडीएस हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. या युतीबाबत भाजपचे कर्नाटकातील नेते बीएस येडियुरप्पा हे अनेक वेळा माध्यमांसमोर बोलले आहेत. जागा वाटप निश्चित नसले तरी येडियुरप्पा यांनी युतीमुळे कर्नाटकमधील 25 ते 26 जागांवर आमचा विजय होऊ शकतो, असे जाहीर केले आहे.जेडीएस पक्षाला लोकसभा निवडणुकीत चार जागा दिल्या जातील, असे येडियुरप्पा यांनी जाहीर केलेले आहे. परंतु कुमारस्वामी यांनी जागा वाटप झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Tags

follow us