PM Modi Gave Mantra To Ministers For Loksabha 2024 : देशातील पाच राज्यांमध्ये यावर्षी विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत तर, पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असून, या निवडणुकांसाछी देशातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपकडूनही निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभेसाठी भाजपकडून ‘थ्री सेक्टर’ रणनीती आखण्यात आली असून, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं कसं प्लॅनिंग करावे याचा मंत्र भाजपच्या मंत्र्यांना दिला आहे.
विदर्भ, मुंबईतील ‘या’ लोकसभा जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात होणार ताणाताणी ?
काल (दि. 28) पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित, शोषित, गरीब आणि मागासवर्गीयांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना मंत्र्यांना दिल्या आहेत. तसेच या विभागांशी संबंधित समस्यांना विशेष प्राधान्य द्या असेही सांगितले आहे. याशिवाय पीएम मोदींनी मंत्र्यांना आपापल्या मंत्रालयांच्या योजनांमध्ये गरीब आणि मध्यमवर्गीयांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.
पंढरपुरात विठू नामाचा गजर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आषाढीची शासकीय महापूजा
पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघातील मागासवर्गीयांवर लक्ष केंद्रित करण्यास, त्यांच्या जीवनात गुणात्मक सुधारणा करण्यासाठी काम करण्यास सांगितले आहे. या विभागांमध्ये छोट्या बैठका, चर्चासत्रे इत्यादी आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारला गरीब, शोषित, वंचित, मागास आणि मध्यमवर्गाशी थेट जोडतील अशा योजनांवर काम करण्याच्या सूचना मोदींनी दिल्या आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना मंत्रालयात प्रगतीशील आणि सर्जनशील विचारांवर लक्ष केंद्रित करून या धोरणानुसार पुढे जाण्यास सांगितले आहे.
पंढरपुरात विठू नामाचा गजर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आषाढीची शासकीय महापूजा
पीएम मोदी अॅक्शन मोडमध्ये
परदेश दौऱ्यावरून परत आल्यापासून पंतप्रधान मोदी अॅक्शन मोडमध्ये आहेत आणि सतत बैठका घेत आहेत. बुधवारीही पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी वरिष्ठ कॅबिनेट मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संघटन मंत्री बीएल संतोष आणि इतर नेते सहभागी झाले होते. या बैठकीत समान आचारसंहिता (UCC), सरकार आणि संघटनेतील बदल, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुका लक्षात घेता केंद्रीय मंत्रिमंडळात काही बदल होऊ शकतात, तसेच काही राज्यांमध्ये पक्षीय पातळीवरही बदल दिसून येऊ शकतात, असे मानले जात आहे.