विदर्भ, मुंबईतील ‘या’ लोकसभा जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात होणार ताणाताणी ?

  • Written By: Published:
विदर्भ, मुंबईतील ‘या’ लोकसभा जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात होणार ताणाताणी ?

Maha Vikas Agadhi : महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षाच्या बैठका सुरू आहेत. ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपावरून काही वाद आहेत. त्यात ठाकरे गटाकडून त्यांनी २०१९ मध्ये जिंकलेल्या सर्व जागांवर दावा सांगण्यात येत आहे. जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील खासदार संजय राऊत (Sanjay Raut), नाना पटोले, अजित पवार यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी एक मोठे विधान केले आहे. शिवसेनेत फूट 13 खासदार शिंदे गटात गेले आहेत. या 13 खासदारांच्या जागेवर मिरीटनुसार निर्णय घेण्यात येईल, अशी आम्हाला आशा असल्याचे विधान चव्हाण यांनी केले आहे.(loksabha seat congress thackeray group conflict vidharabha and-mumbai seat)

त्यात ठाकरे गटाला सोडून गेलेल्या खासदारांच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे चव्हाण यांच्या विधानाने ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाण यांनी मुंबईत विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या जागावाटपाबाबत हे विधान केले आहे. दक्षिण-मध्य (मुंबई), उत्तर-मध्य (मुंबई), यवतमाळ, कल्याण, हातकलंगणे, कोल्हापूर, बुलडाणा, नाशिक, मावळ, हिंगोली, रामटेक, परभणी, शिर्डी या लोकसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीत जास्त ताणाताणी होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्याची फसवणूक, शैक्षणिक कर्जाच्या नावावर ३७ लाखाचा गंडा; कागदपत्रावर उचलले वैयक्तिक कर्ज

२०१९ च्या लोकसभेच्या अनेक जागांवर काँग्रेस विरुध्द शिवसेना, राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना अशा लढती होत होत्या. परंतु आता महाविकास आघाडी असल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. त्यात ताकद असणारा मतदार संघ ज्या- त्या पक्षाला द्यायचा, असा विचार पुढे आला आहे.

यातील शिर्डी लोकसभेचा जागेचा विचार केल्यास येथून दोनदा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. या जागेवर काँग्रेस-शिवसेना अशी लढत होत होती. खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेले आहेत. येथील जागेवर ठाकरे गट दावा करत आहेत. परंतु हा मतदारसंघ काँग्रेस मागत आहेत. तेथे काँग्रेसची ताकद आहे.

राजापूर मतदारसंघ : अजितदादांच्या मनातील उमेदवार ठरला!

हातकलंगणेचे खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात गेले आहे. या ठिकाणी काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे हे खासदार राहिले आहेत. तर कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हेही शिंदे गटाकडे गेले आहेत. मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक व मंडलिक यांची लढत झाली होती.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटाकडे गेले आहेत. ही जागा काँग्रेस मागत आहे. मागील वेळेस काँग्रेसकडून लोकसभा लढणारे सुभाष वानखेडे हे पुन्हा ठाकरेंकडे आले आहेत. तेही येथून उमेदवारी मागत आहे. त्यामुळे या जागेचा पेच आहे.

रामटेक मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. रामटेक मतदारसंघात कृपाल तुमाणे खासदार असून, त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. या जागेवर काँग्रेसचे मुकूल वासनिक हे अनेकवेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसला ही जागा हवी आहे.

यवतमाळच्या खासदार भावना गवळी शिंदे गटात आल्या आहेत. या जिल्ह्यात काँग्रेसचे ताकद आहे. तेथे माणिकराव ठाकरे, वसंत पुरके, शिवाजी मोघे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ही जागाही काँग्रेसला हवी आहे.
नाशिकचे हेमंत गोडसे हे शिंदे गटात गेलेले आहेत. ही जागा राष्ट्रवादीला हवी आहेत. तशीच परिस्थिती मावळ मतदारसंघात निर्माण झालेली आहे. मावळचे खासदार शिंदे गटात गेलेले आहेत. मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार येथून उमेदवार होते. या जागेवर राष्ट्रवादी दावा सांगत आहेत.

मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेलेले आहेत. या ठिकाणी काँग्रेसचे संजय निरुपम आणि कीर्तीकर यांच्यात लढत झालेली आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेस मागत आहे. दक्षिण-मध्यमध्ये शिवसेनाविरुध्द काँग्रेस अशी लढत होत होती. आता येथील खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे ही जागाही वादात आहे. दक्षिण-मुंबईत अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे खासदार आहे. येथे काँग्रेसचे मिलिंद देवरा हे दावेदार आहेत. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून काँग्रेस व ठाकरे गटात जागा वाटपावरून मतभेद होऊ शकतात. कारण या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे जुने नेते आहेत. काँग्रेसचा मतदारही या भागात आहे. तर ठाकरे गटाची ताकद येथे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube