Shivsena Vs Bjp : पक्षात कमी डोक्याचे लोकं, जाहिरातबाजीवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले…

Shivsena Vs Bjp : पक्षात कमी डोक्याचे लोकं, जाहिरातबाजीवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले…

Devendra Fadnvis Speak On Advertisement : पक्षात कमी डोक्याचे लोकं असतात ते चुका करतात, त्यामुळे विरोधकांनी गैरसमज करुन घेऊ नये, असं पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उघडपणे बोलले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जाहिरातीबद्दल फडणवीसांना थेट विचारण्यात आलं होतं. तेव्हा फडणवीसांना उत्तर देताना पक्षातील काही लोकं कमी डोक्याचं असल्याचं म्हटले आहेत.

हा तर मुख्यमंत्री शिंदेंचा बालिशपणा, सुरक्षेत कपात अन् शाखेच्या कारवाईवर आदित्य ठाकरे कडाडले…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्यात कोणतीही स्पर्धा नाही. जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं की चुकीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. आमच्या चांगला समजूतदारपणा असून मी त्यांचा सन्मान मोडत नाही आणि तेही मला उपमुख्यमंत्री असल्याचं भासवू देत नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

वीज पारेषण विभागात तीन हजार पदांची मेगा भरती, 19 जुलैपर्यंत करू शकता अर्ज

तसेच पक्षात काही लोकं कमी डोक्याचे लोकं असतात, ते चुका करतात. याचा अर्थ असा नाही की सरकार पडणार वेगैर, कोणाला असं वाटत असेल तर तसं होणार नाही. आमचं सरकार खुर्च्या तोडण्यासाठी बनलेलं नाही. मी उपमुख्यमंत्री असूनही नाराज नाही. मला पक्षाने उपमुख्यमंत्री बनवलं आहे. उद्या मला चपरासी बनवलं तरी बनणार असल्याचं ते म्हणाले. कारण माझं अस्तित्वच भाजपमुळे आहे.

Mamata Banerjee : ममतांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; जखमी बॅनर्जींना तातडीने रुग्णालयात हलवले

आगामी 2024 च्या निवडणुकीनंतरही मुख्यमंत्री शिंदेंच मुख्यमंत्री असतील, मी मुख्यमंत्री असताना खूप कामे केली आहेत. त्यामुळे मी सध्या उपमुख्यमंत्रिपदावर खूश असून आगामी निवडणुकांमध्ये राज्यात पुन्हा भाजप-सेनेचं सरकार आणणं हे प्राधान्य असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सर्वेनूसार राज्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती मिळाल्याचं जाहिरातीतून दर्शवण्यात आलं होतं. एवढंच नाहीतर देशात नरेंद्र मोदी तर राज्यात एकनाथ शिंदे अशा मजकूराची ही जाहिरात होती. या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा फोटो नसल्याने एकच चर्चा रंगली होती. अखेर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहिराती केलेली चूक दुरुस्ती करुन पुन्हा फडणवीसांसह इतर नेत्यांचा फोटो छापून प्रसिद्ध करण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube