हा तर मुख्यमंत्री शिंदेंचा बालिशपणा, सुरक्षेत कपात अन् शाखेच्या कारवाईवर आदित्य ठाकरे कडाडले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंएवढा बालिशपणा कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी केला नसेल, अशी जळजळीत टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे सरकारने उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी शिंदेंचा ‘बालिशपणा’ असा उल्लेख केला आहे.
मोठी बातमी : चांद्रयान – 3 प्रक्षेपणासाठी सज्ज, 12-ते 19 जुलै दरम्यान आकाशात झेपावणार
आदित्य ठाकरे म्हणाले, माझ्या सुरक्षेबद्दल मी एवढं बोलणं योग्य नाही. मात्र, मुख्यमंत्री शिंदेंएवढा बालिशपणा याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केला नसेल, असं म्हणत ठाकरेंनी टीका केली आहे. तसेच मुंबईतील शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर चालवला आहे. महापालिकेने बेकादेशीर शाखा म्हणत ही कारवाई केली तर दुसरकीडे ठाकरे गटाकडून ही शाखा 40 वर्षांपासून जुनी असल्याचं म्हणत सूड उगवण्यासाठीच कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहेत. त्यावर सडेतोड भाष्य करीत ठाकरे यांनी शिंदेंवर टीका केली आहे.
Video : लॉर्डसच्या मैदानावर हंगामा; बेअरस्टोने आंदोलनकर्त्याला उचलले अन्…
शिवसेनेच्या शाखेवर जेव्हा बुलडोझर चालवला तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा मारण्याची गरजच नव्हती, असं ठाकरे म्हणाले आहेत. तसेच राज्यात विरोधी पक्षनेत्यांना सुरक्षा दिली जाते पण इथं खोटं बोलून सरकारकडून सुरक्षा कमी केली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
वरिष्ठ IRS अधिकारी ईडीच्या जाळ्यात; 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात ठोकल्या बेड्या
दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात 100 ते 125 लोकांना शिंदे सरकारने कुठे सुरक्षा दिली आहे हा प्रश्न उपस्थित होत असल्याचंही ते म्हणाले आहेत. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी इतर घडामोडींवरही भाष्य केल्याचं पाहायला मिळाले आहेत.
दरम्यान, शिंदे सरकारचे 40 आमदार मंत्रिपदासाठी आस लावून बसले आहेत. पण राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही हे माझ्याकडून लिहुन घ्या, कारण हे सरकार पडणार आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचं भाकीत आदित्य ठाकरेंनी केलं आहे.