Video : लॉर्डसच्या मैदानावर हंगामा; बेअरस्टोने आंदोलनकर्त्याला उचलले अन्…

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 06 28T171425.729

Eng Vs Aus 2nd Match :  इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिका 2023 चा दुसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच जस्ट स्टॉप ऑइलच्या विरोधकांनी सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे काही काळ खेळ थांबवण्यात आला. मैदानावर आंदोलकांना पाहून इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने हे प्रकरण स्वत: हाताळले आणि एका आंदोलकाला उचलून सीमारेषेच्या बाहेर सोडले.

या व्हिडीओला भारताचा फिरकी गोलंदाज आर. आश्विन याने शेअर केले असून या व्हिडीओला त्याने कॅप्शनदेखील दिले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याची चांगली सुरुवात, असे त्याने म्हटले आहे.

सामन्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉड मीडियी सेंटर एंडला उभा होता. अचनाक दोन आंदोलक भगवा रंग घेऊन मैदानावर धावले अन् एकाने तो रंग हवेत उडवला. यानंतर बेन स्टोक्स आणि डेव्हिड वॉर्नर हा प्रकार पाहून हडबडले. याचवेळी बेअरस्टोन एका आंदोलकाला धरे अन् उचलून त्याला मैदानाबाहेर नेले. त्यानंतर ग्राऊंड स्टाफने मैदान साफ केले.

भाजपच्या पडद्यामागील चाणाक्याला काँग्रेसचा दणका; राहुल गांधींवरील व्हिडीओ अमित मालवीयांना महागात

दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध यांच्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक विजय मिळवला. दुसरा सामना इंगल्ंडच्या लॉर्डस मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

‘बीसीसीआय’वर शिंदे सरकार मेहरबान; सुरक्षा शुल्कात दिली भरभक्कम सवलत

अ‍ॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्स राखून जिंकला. 281 धावांचा पाठलाग करताना उस्मान ख्वाजा याने 65 तर कर्णधार पॅट कमिन्स याने नाबाद 44 धावांची खेळी केली. चौथ्या दिवशीच इंग्लंडने 3 विकेट्स मिळवल्या होत्या. अन् पाचव्या दिवशी पावसामुळे एक सत्र वाया गेले. तरीदेखील इंग्लंडने कांगारुंना धक्के दिले. पण कमिन्स, अखेरपर्यंत उभा राहिला अन् त्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

 

Tags

follow us