Loksabha Election : देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकामध्ये (Loksabha Election) होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी तयाारी सुरू केली आहे. मात्र या दरम्यान सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. ती म्हणजे जे मतदार लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही. त्यांच्या बॅंक खात्यावरून 350 रूपये कापले जाणार आहेत. या बातमीमुळे नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या बातमीमागील सत्य काय आहे? जाणून घेऊ…
चीनची अर्थव्यवस्था डबघाईला! परदेशी गुंतवणूकदारांनी 188 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढली
…अन्यथा बॅंक खात्यावरून वजा होणार रक्कम
या बातमीमागील सत्य तपासून केंद्र सरकारच्या फॅक्ट चेकींग युनिट पीआयबीने याबद्दल माहिती दिली आहे. ही बातमी होळीच्या वेळी एक गंमतीचा भाग म्हणून छापण्यात आली होती. या बातमीच्या खाली ‘बुरा ना मानो होली है’ असं ही लिहिण्यात आलं होतं. मात्र लोकांनी ती खरी मानली आणि सोशल मीडियावर शेअर केली. मात्र ही बातमी सत्य नसल्याचं फॅक्ट चेकींग युनिट पीआयबीने सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही.
Rohit Pawar : मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे… राणेंच्या दाढीबद्दलच्या टीकेला रोहित पवारांचे उत्तर
काय आहे ही बातमी?
या व्हायरल बातमीमध्ये सांगण्यात आलं होतं की, देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकामध्ये होणार आहेत. जे मतदार लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही. त्यांच्या बॅंक खात्यावरून 350 रूपये कापले जाणार आहेत. यासाठी आधार कार्डचा वापर करून मतदान न करणाऱ्यांची ओळख पटवली जाणार आहे.
त्या आधार कार्डला लिंक असणाऱ्या खात्यावरील 350 रूपये कापले जाणार आहेत. तसेच ज्या आधार कार्डचं बॅंक खात नसेल त्यांच्या मोबाईलच्या रिजार्जवेळी ते पैसे कापले जातील. तसेच यामध्ये असे देखील म्हटले गेले होते की, यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाविरोधात कोर्टामध्ये देखील जाऊ शकत नाही.