Download App

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुडन्यूज, एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त; नवे दर काय?

तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सिलिंडर 14 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे.

LPG Price : आज नवीन वर्षाचा पहिलाच दिवस. या पहिल्याच दिवशी (LPG Price) एलपीजी ग्राहकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून एलपीजी सिलिंडर 14 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे. पण, थांबा ही सवलत घरगुती गॅस सिलिंडरसाठी नाही तर फक्त 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी आहे. म्हणजेच घरगुती गॅस टाकीचे दर यंदाही स्थिर ठेवण्यात आले आहेत.

आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 19 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती जाहीर करण्यात आल्या. IOCL कंपनीच्या वेबसाइटवर नवीन दर अपडेट करण्यात आले आहेत. यानुसार राजधानी दिल्ली शहरात व्यावसायिक सिलिंडर आता 1804 रुपयांना झाला आहे. मागील डिसेंबर महिन्यात सिलिंडर 1818.50 रुपयांना मिळत होता. अन्य मोठ्या शहरांतील एलपीजीच्या दरातही बदल झाला आहे.

LPG Price : 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर मिळणार? राजस्थानमध्ये घोषणा अन् संसदेत नकार

मुंबईत गॅसचे दर 15 रुपये कमी

कोलकाता शहरात व्यावसायिक सिलिंडरसाठी 1911 रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी हा सिलिंडर 1927 रुपयांना मिळत होता. येथे जवळपास 16 रुपये कमी झाले आहेत. मुंबईत व्यावसायिक सिलिंडर आजपासून 1756 रुपयांना मिळणार आहे. मागील डिसेंबर महिन्यापर्यंत सिलिंडरसाठी 1771 रुपये द्यावे लागत होते. तामिळनाडूची राजधानी चेन्नई शहरात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी 1966 रुपये द्यावे लागणार आहेत. याआधी हा सिलिंडर 1980.50 रुपयांना मिळत होता.

घरगुती गॅसचे दर जैसे थे

याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली होती. महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका बसला होता. याव्यतिरिक्त घरगुती गॅसच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. 1 ऑगस्टपासून या गॅसचे दर स्थिर आहेत. आताही यात कंपन्यांनी कोणतेच बदल केलेले नाहीत. राजधानी दिल्लीत 14 किलोंचा घरगुती गॅस सिलिंडर 803 रुपयांना मिळत आहे. कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नई शहरात 818.50 रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळत आहे.

सावधान.. एलपीजी गॅस आरोग्यासाठी किती सुरक्षित? स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा संशोधन अहवाल

follow us