Lucknow Court Fine 200 Rupees To Rahul Gandhi : कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. लखनऊच्या न्यायालयाने त्यांना दोनशे रूपयांचा दंड ठोठावला आहे. वीर सावरकर यांच्यावरील वक्तव्याच्या सुनावणीदरम्यान ते न्यायालयात हजर राहिले नाहीत, त्यामुळे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी असा इशारा दिलाय की, राहुल गांधी यांनी कोणत्याही परिस्थितीत 14 एप्रिल 2025 रोजी न्यायालयात हजर (Veer Savarkar) राहावे.
कायदेशीर कारवाई होऊ शकते
जर काँग्रेस खासदार राहुल गांधी 14 एप्रिल 2025 रोजी न्यायालयात हजर राहिले नाहीत, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. राहुल गांधी यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले (Court News) होते. त्यांनी सावरकरांना इंग्रजांचे सेवक आणि पेन्शनधारक म्हटले होते. राहुल गांधींच्या या विधानाविरुद्ध नृपेंद्र पांडे यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात धाव घेतली.
राहुल गांधींच्या वकिलाने काय म्हटले?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वतीने वकील प्रांशू अग्रवाल न्यायालयात हजर झाले. त्यांनी न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी, यासाठी अर्ज दाखल केला. त्याची सुनावणी लखनौच्या एसीजेएम न्यायालयात सुरू आहे. तक्रारदार वकील नृपेंद्र पांडे यांनी न्यायालयाला सांगितले की, वारंवार समन्स बजावूनही राहुल गांधी हजर राहत नाहीत. न्यायालयाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
‘बायको माझं रक्त पिते, त्यामुळे झोपच…’ पोलीस कॉन्स्टेबलसोबत भयंकर घडतंय
राहुल गांधी यांचे वकील प्रांशू अग्रवाल यांनी न्यायालयाला सांगितले की, ते सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, राहुल गांधी यांची दिल्लीत एक महत्त्वाची बैठक होती. याशिवाय त्यांना अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागले, ज्यामुळे ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. प्रांशु अग्रवाल म्हणाले की, राहुल गांधी न्यायालयाचा आदर करतात. ते जाणूनबुजून न्यायालयात हजर राहण्याचे टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधींना 14 एप्रिल 2025 रोजी कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजांचे सेवक आणि पेन्शनधारक असे वर्णन केले होते.