M.K. Stalin : तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाने 108 जागा जिंकल्या होत्या मात्र बहुमतापासून 10 जागा दुर असणाऱ्या टीव्हीकेला सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेससह इतर पक्षांशी चर्चा करावी लागली. तर दुसरीकडे आता डीएमके प्रमुख एम.के. स्टॉलिन यांनी आपल्या आघाडीतील मित्रपक्षांना टीव्हीकेसोबत हातमिळवणी करण्यासाठी राजी केले असल्याचा दावा डीएमकेचे प्रवक्ते ए.सरवणन यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना सरवणन (A. Saravanan) म्हणाले की, तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री विजय (CM Vijay) यांचे अभिनंदन. डीएमकेच्या (DMK) आघाडीतील मित्र पक्षांच्या मदतीने विजय यांनी आज मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवली आहे. आमचे नेते एम.के. स्टॉलिन (M.K. Stalin) यांना कोणतेही घटनात्मक संकट निर्माण करायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी सखोल विचारविमर्श केल्यानंतर त्यांनी आघाडीतील मित्रपक्षांना टीव्हीकेसोबत सहकार्य करण्यासाठी राजी केले असं माध्यमांशी बोलताना रसवणन म्हणाले.
काँग्रेसवर हल्लाबोल
यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेसला पाच जागा स्टॉलिन यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील स्तरावर त्यांच्यासाठी अथक परिश्रम घेतले होते अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली. टीव्हीकेला सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (एम), व्हिसीके आणि आययूएमएल पक्षाने पाठिंबा जाहीर केला होता. यामुळे 234 सदस्यांच्या विधानसबेत टीव्हीकेची सदस्यसंख्या 120 वर पोहोचली आहे. जी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 च्या आकड्यापेक्षा जास्त आहे.
मोठी बातमी ! ‘विजय थलपती’ तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री
तर दुसरीकडे टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत टीव्हीके प्रमुख विजय यांनी जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर 13 मे पर्यंत विधानसभेत विजय यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
