CM Vijay : तामिळनाडूमध्ये ‘TVK’ सरकार; आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार सी जोसेफ विजय

CM Vijay : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी सुरु झालेलं राजकारण आज संपणार असून टीव्हीके प्रमुख विजय थलपती आज तामिळनाडूचे

CM Vijay

CM Vijay : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी सुरु झालेलं राजकारण आज संपणार असून टीव्हीके प्रमुख विजय थलपती आज तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. डीएमकेचा मित्रपक्ष असलेल्या व्हीसीके आणि आययूएमएलने टीव्हीकेला सत्ता स्थापन करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या दोन्ही पक्षाने बिनशर्त पाठिंबा जाहीर करताच 121 आमदारांचा पाठिंबा असणारा पत्र घेऊन विजय यांनी राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेत सत्ता स्थापन करण्याचा दावा केला.

जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर होणार शपथविधी

तामिळनाडूनचे नवे मुख्यमंत्री म्हणून विजय ( C. Joseph Vijay) आज (10मे) सकळी 10 वाजता जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या वेळी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील उपस्थित राहणार आहे. शपथविधीनंतर 13 मे पर्यंत विधानसभेत विजय यांना बहुमत सिद्ध करण्यास राज्यपालांनी सांगितले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तामिळनाडूमध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग आला होता. टीव्हीकेने 1008 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता मात्र स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काँग्रेसने टीव्हीकेला आपला पाठिंबा जाहीर केला. यानंतर CPI आणि CPI(M) या पक्षांनीही आपला पाठिंबा विजय यांना जाहीर केला.

काँग्रेसचे पाच आणि CPI आणि CPI(M) चे प्रत्येकी दोन- दोन आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर देखील बहुमतासाठी काही आमदारांची गरज असल्याने तामिळनाडूत कोण सरकार स्थापन करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. तामिळनाडूमध्ये विधानसभेचे मुदत संपण्यापूर्वी व्हीसीकेने आपला बिनशर्त पाठिंबा टीव्हीकेला जाहीर केल्याने आज विजय सकाळी १० वाजत मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

तामिळनाडू विधानसभेतील पक्षांची स्थिती

TVK: 108
DMK: 59
AIADMK: 47
काँग्रेस: ​​5
PMK: 4
IUML: 2
CPI: 2
VCK: 2
CPI(M): 2
BJP: 1
DMDK: 1
AMMK: 1

आज चंद्र-राहूचा ‘ग्रहण योग’; मेषसह ‘या’ राशींना होणार फायदा

follow us