Madhya Pradesh Elections : लोकसभा निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीने काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली आहे. मात्र मध्य प्रदेशात पार्टी आपल्या जुन्याच प्लॅनवर काम करत आहे. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने प्रचाराची मोहीम जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत आम आदमी पार्टीच्या एन्ट्रीने येथील निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप अशी न राहता त्रिकोणीय झाली आहे. विशेष म्हणजे, बंगळुरू येथील बैठकीत भाजपला केंद्रातील सत्तेतून बेदखल करण्यासाठी नावारुपास आलेल्या INDIA आघाडीतही आप सहभागी आहे. परंतु, मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मतांत विभागणी करू शकते.
मध्य प्रदेशात या वर्षातच निवडणुका आहेत. त्यामुळे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मध्य प्रदेशात आले होते. येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. रॅलीही काढली. मध्य प्रदेश वगळता छत्तीसगड, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. अशात आप या दोन राज्यांत काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण करू शकते. तर मध्य प्रदेशातील निवडणुकीत एन्ट्री घेऊन काँग्रेसचा खेळ बिघडवण्याची शक्यता नक्कीच आहे.
https://letsupp.com/national/bjp-mla-has-alleged-that-prime-minister-narendra-modi-and-home-minister-amit-shah-do-not-have-time-to-listen-to-the-seriousness-of-the-situation-in-manipur-71066.html
राजकीय जानकारांच्या मते, मध्य प्रदेशातील आम आदमी पार्टीच्या एन्ट्रीचा सर्वाधिक फटका काँग्रेसलाच बसणार आहे. यामागे कारणही दिले जात आहे की गुजरात निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या आपने काँग्रेसलाच झटका देत मतांमध्ये विभागणी केली. येथे ज्या जागा जिंकल्या त्या जागांवर मागील निवडणुकीत काँग्रेसने जिंकल्या होत्या.
मध्य प्रदेशचा विचार केला तर सध्या आम आदमी पार्टी येथे भाजपला आव्हान देण्याच्या स्थितीत नाही. पण, निवडणुकीला त्रिकोणीय नक्कीच करू शकते. याचा जास्त फटका भाजपऐवजी काँग्रेसलाच बसण्याची चिन्हे दिसत आहेत. इतकेच नाही तर काँग्रेसला डिवचण्यासाठी अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ग्वाल्हेरमधूनच निवडणुकीसाठी सज्ज असल्याची घोषणा केली.
गुजरातमध्ये पावसाचे थैमान, पुरात म्हशी, गाड्या गेल्या वाहून, धक्कादायक VIDEO व्हायरल
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सहभागी होण्याआधी काँग्रेसने केंद्र सरकारच्या अध्यादेशावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आपने केली होती. या अध्यादेशावर काँग्रेसने ‘आप’ला पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतरच पक्ष या आघाडीत सामील झाला. या बैठकीत अरविंद केजरीवाल सहभागी झाले. मात्र मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात पक्ष त्यांच्या जुन्याच प्लॅनवर वाटचाल करत असल्याचे दिसून आले आहे.
आम आदमी पार्टीच्या या राजकारणावरून असा अर्थ काढला जात आहे की लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या आघाडीत सामील असले तरी विधानसभा निवडणुकीत मात्र कोणतीही आघाडी करणार नाही. यामागचे कारणही खास आहे. आम आदमी पार्टीने काँग्रेसला एक अलिखित प्रस्ताव दिला होता की काँग्रेसने जर दिल्ली आणि पंजाबमधील निवडणुका लढल्या नाहीत तर आम आदमी पार्टी सुद्धा काँग्रेसशासित राज्यात निवडणूक लढणार नाही. मात्र, या प्रस्तावार पुढे काहीच कार्यवाही झाली नाही.