Download App

Mahadev App scam: कोण आहे सौरभ चंद्राकर, लग्नावर 200 कोटी खर्च, ज्यूस दुकानदार ते ‘सट्टा किंग’

Mahadev Satta App: महादेव बुक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ऑनलाइन जुगार अॅपवर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी कोलकाता, भोपाळ आणि मुंबईत छापे टाकत 417 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या पथकाने सांगितले. महादेव बुक अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहेत. तो दुबईमधून हे रॅकेट चालवत होता.

सौरभ चंद्राकर कोण आहेत ते जाणून घेऊया.
लग्नाला सेलिब्रिटींनी हजेरी लावली
सौरभ चंद्राकर याचा विवाह सोहळा युएईमध्ये झाला होता. मोठी फी देऊन चित्रपटसृष्टीतले नामवंत कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. सौरभ चंद्रकारच्या लग्नासाठी दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त रोखीने व्यवहार झाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात अभिनेता टायगर श्रॉफ, कृष्णा अभिषेक, नेका कक्कड, आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, भारती सिंग, सनी लियॉनी, भाग्यश्री, क्रिती खरबंदा, नुसरत भरुचा आदी सेलिब्रिटी त्याच्या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.

कोण आहे सौरभ चंद्राकर?
सौरभ चंद्राकर हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे वडील महापालिकेत पंप ऑपरेटर होते. सौरभचेही ज्यूसचे दुकान होते. 2019 मध्ये तो दुबईला गेला आणि त्याने त्याचा मित्र रवी उत्पललाही फोन केला. यानंतर त्याने महादेव अॅप लाँच केले आणि नंतर हळूहळू ऑनलाइन बेटिंग मार्केटमध्ये मोठे नाव बनले.

इलॉन मस्क बनला गुगल फाऊंडरच्या संसाराचा व्हिलन, निकोल शानाहानसोबत होते अफेअर

दुबईत उभारले साम्राज्य
ईडीने सांगितले की, सट्टेबाजीचे पैसे खात्यांवर पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हवाला ऑपरेशन केले जाते. नवीन युजर्स आणि फ्रँचायझी (पॅनेल) धारकांना आकर्षित करण्यासाठी सट्टेबाजीच्या वेबसाइट्सच्या जाहिरातीसाठी भारतात मोठ्या प्रमाणात खर्च देखील केला जात आहे. सौरभ चंद्राकर आणि उप्पल यांनी यूएईमध्ये स्वत:साठी साम्राज्य निर्माण केल्याचे ईडीने म्हटले आहे.

लग्नावर 200 कोटी रुपये खर्च
“फेब्रुवारी 2023 मध्ये चंद्राकरचे यूएई येथे लग्न झाले आणि या विवाह सोहळ्यासाठी महादेव एपीपीच्या प्रवर्तकांनी सुमारे 200 कोटी रुपये रोख खर्च केले. कुटुंबातील सदस्यांना नागपुरातून यूएईला नेण्यासाठी खासगी जेट भाड्याने घेण्यात आली, असा आरोप आहे.

Aatmapamphlet Trailer : अतरंगी अन् तिरकस विनोदी प्रेमकथा;’आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

छत्तीसगडमध्ये अनेकांना अटक
या प्रकरणी ईडीने अलीकडेच छत्तीसगडचे पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रभूषण वर्मा, सहयोगी आयुक्त अभिषेक चंद्राकर, पर्यवेक्षक अनिल दममानी आणि सुनील दममानी यांना अटक केली होती. महादेव बुकशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात विनोद वर्मा यांचीही चौकशी करण्यात आली होती.

Tags

follow us