इलॉन मस्क बनला गुगल फाऊंडरच्या संसाराचा व्हिलन, निकोल शानाहानसोबत होते अफेअर

इलॉन मस्क बनला गुगल फाऊंडरच्या संसाराचा व्हिलन, निकोल शानाहानसोबत होते अफेअर

Sergey brin-shanahan divorce : गुगलचे सहसंस्थापक सर्जे ब्रिन यांनी पत्नी निकोल शानाहान हिला घटस्फोट दिला आहे. रिपोर्टनुसार, टेस्ला आणि एक्सचा मालक एलोन मस्कसोबतच्या अफेअरच्या आरोपांमुळे शानाहानने यावर्षी मे महिन्यात घटस्फोट घेतला. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, ब्रीन आणि शानाहान यांचा 26 मे रोजी घटस्फोट झाला. ही माहिती आता समोर आली आहे. सध्या ते दोघेही त्यांच्या 4 वर्षांच्या मुलीच्या कायदेशीर कस्टडीवरून भांडत आहेत.

अहवालानुसार, ब्रिन आणि शानाहान यांनी वकीलाची फिस आणि मालमत्ता विभागणीसह इतर समस्या देखील शांतपणे सोडवल्या आहेत. दोघांनी 2015 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. त्याच वर्षी, ब्रिनने त्याची पहिली पत्नी अॅन वोजिकीपासून घटस्फोट घेतला. यानंतर, सर्गेई ब्रिन आणि निकोल शानाहान यांनी 2018 मध्ये लग्न केले. 2021 मध्येच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि दोघेही वेगळे राहू लागले. आणि त्यानंतर 2022 मध्ये ब्रिनने घटस्फोटासाठी अर्ज केला.

मस्कने निकोलसोबतचे संबंध नाकारले
सर्गेई ब्रिनने याला मतभेद म्हटले आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार, ब्रिनने शानाहान मस्कसोबत दिसल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. शानाहान आणि मस्क अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र असल्याचे वृत्त आहे.

आशिया कप महामुकाबला; कोण होणार चॅम्पियन? कोणाचे पारडे जड

मात्र, मस्कने शानाहानशी कोणताही संबंध असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या लेखाला प्रतिसाद म्हणून 25 जुलै 2022 रोजी मस्कने X वर लिहिले, ‘सर्गेई आणि मी मित्र आहोत. काल रात्री एकत्र पार्टीत होतो. मी निकोलला 3 वर्षांत फक्त दोनदा पाहिले आहे. दोन्ही वेळी आमच्या आजूबाजूला इतरही अनेक लोक उपस्थित होते. रोमँटिक काहीही नाही.’

निकोलनेही संबंध नाकारले
दुसरीकडे निकोल शानाहानने मस्कसोबतचे त्यांचे नाते केवळ मैत्रीचे आहे. अ‍ॅलन आणि मी सेक्स केला नाही, आमचे प्रेमसंबंध होते नाहीत, आमचे कधीच अफेअर नव्हते.

Delhi YashoBhoomi Photo : भारत मंडपम नंतर आता यशोभूमी तयार, उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

असे असूनही, वॉल स्ट्रीट जर्नलने सांगितले की ते ‘आमच्या सोर्सिंगवर विश्वास ठेवतात आणि आमच्या रिपोर्टिंगवर ठाम आहेत.’ दरम्यान, 50 वर्षीय गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन $118 बिलियन संपत्तीचे मालक आहेत. ते जगातील 9 व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube