Delhi YashoBhoomi Photo : भारत मंडपम नंतर आता यशोभूमी तयार, उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

Delhi YashoBhoomi Inauguration: आंतरराष्ट्रीय बैठका आणि परिषदा आयोजित करण्यासाठी देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आता द्वारका, दिल्ली येथं इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (IICC) बांधले गेले, त्याला ज्याला 'यशोभूमी' असे नाव देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (17 सप्टेंबर) दिल्लीतील द्वारका येथे 'यशोभूमी'चे उद्घाटन करणार आहेत. ही यशोभूमी एक जागतिक दर्जाची एक्स्पो सेंटर आहे.

एकूण 8.9 लाख चौरस मीटर क्षेत्रात ‘यशोभूमी’ बांधण्यात येत असून, त्यापैकी 1.8 लाख चौरस मीटरचे काम पूर्ण झाले आहे.

यशोभूमीमध्ये 15 कन्व्हेन्शन हॉल आणि 13 मीटिंग हॉल आहेत. तसेच मुख्य सभागृह आणि भव्य बॉलरूम आहे. यात एकूण 11,000 प्रतिनिधींसाठी बसण्याची व्यवस्था आहे.

कन्व्हेन्शन सेंटरच्या मुख्य सभागृहात एका वेळी 6000 पाहुणे बसू शकतात.
