Mahakumbh Viral Girl Monalisa : प्रयागराज 2025 च्या महाकुंभात निळ्या-तपकिरी डोळ्यांची रुद्राक्ष विकणारी मुलगी मोनालिसा भोसले आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. व्हायरल गर्ल म्हणून सोशल मीडियावर ओळखली जाणारी मोनालिसा भोसलेने तिच्या मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न केल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, व्हायरल गर्ल मोनालिसाने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन मुस्लिम बॉयफ्रेंड फरमान खानशी लग्न केले आहे. तसेच कुटुंबावर गंभीर आरोप करत तिने पोलिस संरक्षण देखील मागितले आहे.
केरळमधील अरुमानूर मंदिरात लग्न
मोनालिसा (Mahakumbh Viral Girl Monalisa) आणि फरमानने (Farman) बुधवारी केरळमधील अरुनानूर मंदिरात लग्न केले असून सध्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी मोनालिसाने बॉयफ्रेंड फरमानसह तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) पोलिसांकडे धाव घेत वडील त्यांच्या पसंतीच्या मुलासह लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. बॉयफ्रेंड दुसऱ्या धर्माचा असल्याने मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले (Jaisingh Bhosale) या लग्नाचाविरोध करत होते असा दावा तिने केला आहेय. लग्नाला कुटुंबाचा विरोध असल्याने बुधवारी तिने घर सोडून फरमानसोबत केरळमधील (Kerala) अरुनानूर मंदिरात (Arunanur Temple) लग्न केले.
फेसबुकवर ओळख
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, मोनालिसा आणि फरमान गेल्या दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. सुरुवातीला दोघांची मैत्री फेसबुकवर झाली. यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एका वृत्तानुसार, सुरुवातीला मोनालिसानेच फरमानकडे लग्नाची मागणी केली होती मात्र फरमाने नकार दिला होता. पण नंतर तोही तिच्या प्रेमात पडल्याने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला गोळीबारातून थोडक्यात बचावले; आरोपीला अटक-
कोण आहे व्हायरल गर्ल ?
मोनालिसाप्रयागराज 2025 च्या महाकुंभात निळ्या-तपकिरी डोळ्यांची रुद्राक्ष विकणारी मुलगी मोनालिसा भोसले सोशल मीडिया तुफान व्हायरल झाली होती. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाला अनेक ठिकाणाहून मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. यानंतर तिने द डायरी ऑफ मणिपूर नावाच्या हिंदी चित्रपटात काम करण्याची देखील संधी मिळाली आहे. याचबरोबर सध्या ती अनेक ब्रॅंड प्रमोशनवर देखील काम करत आहे.
