Kerala Assembly : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांंना हटवा; विधानसभेत प्रस्ताव मंजूर

Kerala Assembly : देशाच्या राजकारणात सध्या चर्चेत असणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Kerala Assembly

Kerala Assembly : देशाच्या राजकारणात सध्या चर्चेत असणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्ताव दिल्लीत आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता मुख्य निवडणूक आयुक्त यांना हटवण्यासाठी केरळ विधानसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. राज्य विधानसभेने मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी करणारा एक ठराव मंजूर केला असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीसन यांनी दिली. असा ठारव मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ठारावत एसआयआरवर देखील गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

केरळने या ठरावाद्वारे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. एसआयआर प्रक्रियेदरम्यान झालेल्या कथित अनियमिततेचे निवारण करणे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू करणे आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या मर्यादित समितीची पुनर्रचना करणे.

SIR मधील अनियमिततेचे आरोप

मुख्यमंत्र्यांनी केलेली पहिली मागणी ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेबाबत आहे. सतीसन यांनी सांगितले की, या प्रक्रियेतील कथित अनियमिततेमुळे ज्या पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आली होती, त्यांचे मतदानाचा अधिकार त्वरित बहाल केला गेला पाहिजे. एसआयआर  प्रक्रियेमध्ये नोंदणीकृत मतदारांच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी मतदार यादीची छाननी आणि सुधारणा केली जाते. या प्रक्रियेदरम्यान पात्र मतदारांची नावे वगळल्या गेल्याच्या चिंतेमुळे निवडणूक प्रणालीची पारदर्शकता आणि नागरिकांचा मतदानाचा अधिकार यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केरळ विधानसभेचा ठराव याच मुद्द्यावर कारवाईची मागणी करतो.

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी

केरळ सरकारची दुसरी मागणी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्याशी संबंधित आहे. सतीसन यांच्या मते, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या निष्पक्षतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आधारावर, त्यांनी त्यांना पदावरून हटवण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीचे समर्थन केले.

follow us