Download App

राम मंदिराला भरघोस देणगी देणाऱ्या महंतांचा भीषण अपघातात मृत्यू

Mahant dead in Road Accident: मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये एक मोठा कार अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बरमान-सगरी नॅशनल हायवे 44 वर हा भीषण अपघात झाला. यामध्ये महंत कनक बिहारी महाराजांचं निधन झालं. बाईक स्वाराला वाचवण्यासाठी त्यांची कार डिव्हायडरला धडकली आणि या दुर्घटनेत महंतांसह दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

महंत कनक बिहारी दास महाराजांनी उत्तर प्रदेशमधील अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिरासाठी तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. रघुवंश शिरोमणी 1008 या नावाने प्रसिद्ध आहेत. तर ते रघुवंशी समाजाचे राष्ट्रीय संत म्हणूनही ओळखले जातात.

अतिक-अशरफ हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेलेले ते दोघे कोण?

या महाराजांचा आश्रम मध्य प्रदेशातील छिंदवाड़ा जिल्ह्यातील नोनी येथे आहे. महाराज यूपीतील प्रयागराजहून छिंदवाड़ा येथे परतत होते. यावेळी बरमान-सगरी नॅशनल हायवे-44 वर त्यांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. महाराज अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या यज्ञाची तयारी करत होते. त्यातच ही दुर्घटना घडली आहे.

रघुवंशी समाजाच्या नरसिंहपुर जिल्हा अध्यक्ष राजकुमार रघुवंशी यांनी सांगितलं की, महंत कनक महाराजांनी 1 कोटी रूपये दिले होते. तसेच महाराज 10 फेब्रुवारी 2024 ला अयोध्येमध्ये 9 कुंडीय यज्ञ करणार होते. त्यासाठी ते रघुवंशी समाजाच्या सर्व गावांमध्ये जाणार होते.

Tags

follow us