Download App

उशीरा आलेला मान्सून कसर भरुन काढणार? देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज

Rain Update : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात वरुणराजाचं जोरदार आगमन झालं आहे. हवामान विभागाने (Department of Meteorology) महाराष्ट्रासह 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आहे. त्याचबरोबर देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) तीन जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra-25-state-heavy-rain-warning-imd)

70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर शरद पवारांचे मोदींना प्रत्युत्तर, ‘एक रुपयाही…’

राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे विविध भागांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळाले आहे. याचा अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. उशीरा का होईना पण मान्सूनचं आगमन झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर भागामध्येही पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Mamata Banerjee : ममतांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; जखमी बॅनर्जींना तातडीने रुग्णालयात हलवले

देशातील 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज :

हवामान विभागाने देशाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील 25 राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यात महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, आसाम, ओडिशा, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक आणि केरळम आदी राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सध्या आसाम राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आसाममधील बारपेटा येथे पावसाने पुरता धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामच्या काही भागांमध्ये दरड कोसळ्याच्या घटणाही घडल्या आहेत. बहुतेक ठिकाणी पूरससदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील काही भागात वादळी पावसाचा कहर सुरु आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

follow us