Download App

महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये खांदेपालट होणार? दिल्लीत खरगे अन् राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक

Maharashtra Congress : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामध्ये विरोधी पक्ष देखील केंद्रातील भाजप सरकारविरोधात एकवटल्याचं पाहायला मिळत आहेत. तर त्यात आज महाराष्ट्र कॉंग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये पार पडणार आहे. ही बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यत्र मल्लिकार्जुन खरगे आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. (Maharashtra Congress Meeting with Mallikarjun Kharge and Rahul Gandhi in Delhi)

उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या नावाला ‘कलंक’, फडणवीसांचं नाव घेण्याची लायकी नाही; तुषार भोसलेंचा निशाणा

या बैठकीमध्ये आता महाराष्ट्रमध्ये कॉंग्रेस खांदेपालट होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर या बैठकीमध्ये राज्याच्या विरोधी पक्षनेते पदावर त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूक आणि राज्यातील बंडाची परिस्थिती पाहता भाजपपासून आपल्या आमदारांना वाचवण्यासाठी देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

वर्षावर शिंदे-फडणवीस अन् पवारांमध्ये तीन तास खलबतं; खाते वाटपाचा तिढा सुटणार?

तसेच यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदावर देखील चर्चा होणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळाला आहे. त्यासंदर्भात पक्षाध्यक्षांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उचलबांगडी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us