Maharashtra Karnataka border dispute : काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना याला कर्नाटक सरकारकडून फुस देण्याचा प्रयत्न केला जात आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमा क्षेत्रा विकास प्राधिकरणास १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.
काल बेंगलोरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना बोम्मई म्हणाले की “आपण अगोदर सीमाभागाच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. सीमाभागात राहणाऱ्या कानडी लोकांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कर्नाटक सरकार सीमाभागातील लोकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवत आहे. अगोदर सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाला ८ ते १० कोटी रुपये दिले जायचे. आता मात्र या निधीत वाढ करण्यात आली आहे.”
Amid row with Maharashtra, Karnataka CM pledges Rs 100 cr for Border Development Authority
Read @ANI Story | https://t.co/I9cSeiWSFO#Karnataka #basavarajbommai #BorderDevelopmentAuthority pic.twitter.com/2I9hjRfgEU
— ANI Digital (@ani_digital) February 2, 2023
बोम्मई यांचे हे विधान आणि त्यांनी १०० कोटी निधीची केलेली घोषणा पाहता महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारने याआधी या प्राधिकरणाला २५ कोटी दिले आहेत. आता आणखी १०० कोटी रुपयांची घोषणा केली आहे.
कर्नाटक सरकार येत्या बजेटमध्ये त्याची तरतूद करेल, अस बोम्मई यांनी सांगितल आहे. कर्नाटक सरकारच हे शेवटच बजेट असणारं आहे, त्यामुळे यामधून ते मोठ्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.