Download App

सांगलीत शरद पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत? संजयकाका पाटलांनी घेतली पवारांची भेट

भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट पुण्यात आज भेट घेतली आहे.

  • Written By: Last Updated:

Sanjay Kaka Patil Met Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elecion) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Chandra Pawar party) तुतारी हातात घेण्यासाठी राज्यातील अनेक बडे नेते तयारीत आहेत. अशाच आता भाजपचे माजी खासदासंजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याची माहिती पुढं आली. त्यांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

फरार नीरव मोदीवर ईडीची मोठी कारवाई, करोडो रुपयांची मालमत्ता जप्त 

संजयकाका पाटील यांनी बुधवारी (दि. 11) शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट पुण्यातील मोदी बागेत पवार यांच्या निवासस्थानी झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या दोन दिग्गज नेत्यांची भेट राजकीय भुकंपाचे संकेत तर नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.

फरार नीरव मोदीवर ईडीची मोठी कारवाई, करोडो रुपयांची मालमत्ता जप्त 

संजय काका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक भाजपकडून लढण्याच्या तयारीत आहेत. शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अशातच संजय काका पाटील यांनी पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सांगली जिल्ह्यात या भेटीने खळबळ उडाली.

दरम्यान, आता संजय पाटील यांनी या भेटीमागचे कारण स्पष्ट केले आहे. सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण काही दिवसांत होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेतल्याचं संजयकाका पाटील यांनी सांगितलं.

तसेच या भेटीत कोणताही राजकीय चर्चा झाली नसल्यांचं संजयकाका पाटील यांनी सांगत अधिकचं भाष्य करणं टाळलं.

लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्नची जोरदार चर्चा झाली. भाजपचे दोन वेळा खासदार राहिलेल्या या मतदारसंघात विशाल पाटलांनी संजयकाका पाटील यांना पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता त्यांनी पवारांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं. मात्र, ही राजकीय भेट नसून कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासंदर्भातली भेट होती असं त्यांनी केलं. तरीही आगामी काळात सांगलीच्या राजकीय वर्तुळात काय घडामोडी घडतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us