Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणामध्ये तृणमूल खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता वाढली आहे. कारण लोकसभेत एथिक्स कमिटीने आज (8 डिसेंबर) त्यांच्या विरोधात रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच त्यांची खासदारकी रद्द करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : नवाब मलिक कोणत्या गटात? वाद वाढल्यानंतर पटेलांनी दिलं उत्तर
दरम्यान ही रिपोर्ट सादर करण्यात आल्यानंतर त्यावरल चर्चा झाली त्यावेळी या मुद्द्यावर मोईत्रा सभागृहात आक्रमक झाल्या होत्या. दरम्यान संसदेत येण्यापूर्वी त्यांनी त्यांना एथिक्स कमिटीने विचारलेल्या प्रश्नांची तुलना त्यांनी महाभारतातील वस्त्रहरणाशी करत आता महाभारत होणार असल्याचा इशारा दिला. त्या म्हणाल्या की, आई दुर्गा आली आहे. आता पाहू विनाश काली विपरित बुद्धी येत असते. त्यांनी वस्त्रहरण सुरू केलं आता महाभारताचं युद्ध देखील होणार. असं मोईत्रा म्हणाल्या आहेत.
Maharashtra Politics : नवाब मलिक कोणत्या गटात? वाद वाढल्यानंतर पटेलांनी दिलं उत्तर
दरम्यान संसदेच्या पटलावर जेव्हा एथिक्स कमिटीने त्यांचा अहवाल ठेवला. तेव्हा विरोधकांनी याला जोरदार विरोध केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. यामध्ये तृणमूलसह कॉंग्रेस, शिवसेना, आरएसपीच्या खासदारांनी या अहवालावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, अशा प्रकारे घाईत आहवाल आणि प्रस्ताव आणणे योग्य नाही. खासदारांना तो अहवाल वाचण्यासाठी वेळ द्यायला हवा. चर्चा व्हायला हवी.
Jhimma 2: बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना ‘झिम्मा 2’ची टक्कर
तसेच कॉंग्रेस खासदार कार्ति चिदंबरम म्हणाले की, हा एक द्वेष आहे. त्यामुळे 2024 ला महुआ यांना नक्कीच 50, 000 मतं जास्त मिळतील. तसेच अशा प्रकारे महुआ यांची खासदारकी रद्द करणे न्याय्य नाही. भाजप त्यांच्याविरोधात असलेल्या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तर शशि थरूर म्हणाले की, हा अहवाल अविश्वसनीय आणि अपुरा आहे. त्यातील आरोपांवर चर्चा झालेली नाही. यामुळे चुकीचा पायंडा पाडला जात आहे.
दरम्यान यावर भाजपचे बंगाल अध्यक्ष सुकांत मजूमदार म्हणाले की. चिरहरण दौपदीचं झालं होतं. शूर्पनखाचं नाही. या प्रकरणामध्ये महाबारत नाही होणार. महाभारताचे कृष्ण आणि अर्जुन हे तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे आहेत. महाभारत धर्माच्य रक्षणासाठी झालं होतं. महुआ यांनी अधर्म केला आहे. ज्याप्रमाणे महाभारतात धर्माचा विजय झाला होता. तसाच आताही होईल.