Download App

Mahua Moitra : महुआ मोईत्रांचे ग्रह फिरले! ‘त्या’ अहवालाच्या विरोधात फक्त 4 खासदार

Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या (Cash For Query) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडणचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात मोईत्रा यांची खासदारकी जाईल की (Mahua Moitra) राहिल याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस संसदेच्या शिस्तपालन समिताने केली आहे. याबाबतचा अहवाल 6 विरुद्ध 4 फरकाने अहवाल स्वीकारण्यात आला. हा अहवाल आता लोकसभा सचिवालयाकडे पाठविण्यात येईल. 500 पानांच्या या अहवालात खासदार मोईत्रा यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात काय निर्णय येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! लोकपालांनी दिले CBI चौकशीचे आदेश

या समितीने अहवालात अनेक गंभीर आरोप खासदार मोईत्रा यांच्यावर केले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होईल अशा प्रकारची वर्तणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच उद्योगपती दर्शन हिरानंदानी आणि खासदार महुआ मोईत्रा यांच्यात जो आर्थिक व्यवहार झाला आहे त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे, असे समितीने या अहवालात म्हटले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्याच्या मोबदल्यात पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी हे प्रकरण शिस्तपालन समितीकडे सोपवले होते.

फक्त चारच खासदार राहिले पाठिशी 

शिस्तपालन समितीचा अहवाल स्वीकृत करण्याच्या बाजूने ज्या सदस्यांनी मतदान केले. त्यात समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर (भाजप), हेमंत गोडसे (शिवसेना), परनीत कौर (काँग्रेस), अपराजिता सारंगी (भाजप) यांचा समावेश होता. तर दुसरीकडे दानिश अली (बसपा), व्हि. वैथिलिंगम (काँग्रेस), पी. आर. नटराजन (माकपा) आणि गिरधारी यादव (संयुक्त जनता दल) या सदस्यांनी अहवाल स्वीकृत करण्याच्या विरोधात मतदान केले.

Cash For Query : महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात? आजच्या बैठकीतच होणार फैसला

काय आहे प्रकरण ? 

संंसदेत सरकारला प्रश्न विचारण्याच्या मोबद्ल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप खासदार मोईत्रा यांच्यावर आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मोईत्रा यांनी लोकसभेच्या वेवसाइटवरील त्यांचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड हिरानंदानी यांना शेअर केल्याचे मान्य केले होते. तसेच जर रोख स्वरुपात पैसे दिले जात असतील तर त्याची तारीख आणि संबंधित पुरावे देखील सादर करा, असे आव्हान खासदार महुआ मोईत्रा यांनी दिले होते.

Tags

follow us