Download App

भाजपात भाकरी फिरली; पराभवाच्या भीतीने बदलले प्रदेशाध्यक्ष

आगामी वर्ष हे निवडणुकाचं वर्ष आहे. २०२४ मध्ये लोकसभेबरोबरच (Lok Sabha) अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली. नुकतीच पाटण्यात विरोधकांची बैठक झाली. त्यानंतर आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) देखील संघटनेत मोठे बदल केले. (Major reshuffle in BJP before Lok Sabha elections 4 state presidents changed)

भाजपने आज संघटनेत मोठे फेरबदल केले. या फेरबदलामध्ये जी. किशन रेड्डी यांची तेलंगणाच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डी. पुरंदेश्वरी यांची आंध्र प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांना झारखंड आणि सुनील जाखड यांना पंजाबचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. याशिवाय तेलंगणा भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी एटाला राजेंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बहुमत असताना अजितदादांना का घेतले? फडणवीसांनी न्याय दिलाच पाहिजे; शिंदे गटाचे आमदार भडकले

पीएम मोदी-शहा आणि नड्डा यांची महत्त्वपूर्ण बैठक
या नियुक्त्यांपूर्वी 28 जून रोजी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाचे संघटन सरचिटणीस बीएल संतोष यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीपूर्वीही अमित शहा यांनी नड्डा, बीएल संतोष आणि आरएसएसचे सर्वोच्च पदाधिकारी अरुण कुमार यांच्याशी किमान पाच मॅरेथॉन बैठका केल्या होत्या. 5 जून, 6 जून आणि 7 जून रोजी या प्रमुख नेत्यांनी भाजपच्या मुख्यालयात पक्षात बदल घडवून आणण्यासाठी दीर्घ बैठक घेतली होती. यानंतर पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत या बदलांवर चर्चा झाली आणि पंतप्रधानांनी या बदलांना मंजुरी दिली.

निवडणूक राज्यांमध्ये बदल!

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांच्या निवडणुकीबाबतही मोदी-शाह यांच्या बैठकीत चर्चा झाली होती. या राज्यांतील काही नव्या चेहऱ्यांना सरकारमध्ये आणले जाऊ शकते आणि काही मंत्र्यांना चांगले काम करण्यासाठी संघटनात्मक जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा झाली होती आणि तसचं काहीसं झालं.

संघटनात्मक बदल का झाले?
काही दिवसांपूर्वी पाटण्यात मोदी विरोधात एकत्र आले होते. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विरोधकांकडून भाजपला पराभूत करण्यासाठी मोट बांधली जात आहे. त्यामुळे भाजपचेही धाबे दणाणले आहेत. आगामी निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची तर विरोधकांसाठी अस्तित्वाची लढाईच आहे. त्यामुळं भाजपला निवडणुकीची तयारी करण्यासाठी संघटनेत काही बदल करणं इष्ट वाटल्यानं हे बदल करण्यात आल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

शिवाय, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूक निकालांनीही भाजपला आपल्या निवडणूक रणनीतीवर फेरविचार करण्याची गरज असल्याचं स्पष्ट झालं होतं. काँग्रेसने विविध राज्यांतील निवडणूकांध्ये ज्या पद्धतीनं भाजपसमोर आव्हानं निर्माण केलं होतं. त्याला सामोरं जाणं हे भाजपसाठी अवघड काम होतं. कारणं, जनमत सध्या कॉंग्रेसच्या बाजूने असल्याचं दिसतं. या सर्वबाबी लक्षात घेता संघटनेत बदल करणं गजजेंच होतं.

 

Tags

follow us