Andhra Pradesh Train Accident : आंध्रप्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. विजयनगरमध्ये दोन ट्रेन धडकल्या. विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन विजयनगरम जिल्ह्यात रुळावरून घसरली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू असून घटनास्थळी मोठी गर्दी आहे.
Maratha Reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत आहे का? – विखे पाटील
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील विजयनगरममध्ये दोन रेल्वेची धडक झाली. एक पॅंसेंजर ट्रेन उभी होती, त्याचवेळी मागून दुसरी पॅंसेंजर ट्रेन आली. मागून आलेल्या ट्रेनने जोरदार धडक दिल्यानं काही डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 18 हून अधिक जण जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या भीषण रेल्वे अपघातानंतर मदत आणि बचाव पथक अपघहातस्थळी पोहोचले असून जखमी आणि मृत लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
#WATCH | Andhra Pradesh train accident | Rescue operations underway
6 people died and 18 injured in the Andhra Pradesh train accident: Deepika, SP, Vizianagaram pic.twitter.com/XFZrx9NxnV
— ANI (@ANI) October 29, 2023
पूर्व मध्य रेल्वेच्या सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर (ट्रेन क्र. 08504) विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर (ट्रेन क्र. 085532) या ट्रेनमध्ये हा अपघात झाला. या दोन ट्रेनच्या धडकेत काही डबे रुळावरून घसरले. घटनास्थळावरूनची काही फोटो समोर आले असून यात रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याचं दिसतं आहे. या अपघातामुळं पॅसेंजर ट्रेनचे तीन डब्बे रेल्वे रुळावरून घसरले असल्याची माहिती आहे. त्यामुळं घटनास्थळी प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी विजयनगरम येथे झालेल्या रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच, या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना तातडीने मदत करण्याचे आणि जवळच्या गावातून जास्तीत जास्त रुग्णवाहिका अपघातस्थळी पाठवण्याचे आदेश दिले आहेत.