पाकिस्तानात मोठा रेल्वे अपघात; दहा डबे रुळावरून घसरले, 22 प्रवाशांचा मृत्यू

पाकिस्तानात मोठा रेल्वे अपघात; दहा डबे रुळावरून घसरले, 22 प्रवाशांचा मृत्यू

Pakistan Train Accident : पाकिस्तानात मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. रावळपिंडीकडे जाणारी हजारा एक्सप्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले. या अपघातात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही दु्र्घटना शाहजापूर आणि नवाबशाह दरम्यान सहारा रेल्वे स्टेशन परिसरातग घडला. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा रेल्वे कराची येथून पाकिस्तानातील पंजाब प्रांतात चालली होती.

मोठी बातमी : तोषखाना प्रकरणात इम्रान खान दोषी, न्यायालयाकडून 3 वर्षांची शिक्षा; लाहोरमधून अटक

या अपघातातील जखमींना नवाबशाह येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानातील जियो टीव्हीने दिले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना कशी घडली याचे निश्चित कारण अजून कळलेले नाही. रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचनाही दिल्या आहेत. आता जी प्राथमिक माहिती येत आहे त्यातून असे समोर येत आहे की या घटनेत 22 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

पाकिस्तानी रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले, की रेल्वेचे काही डबे रुळावरून खाली उतरले आहेत. लोकांकडूनही स्पष्ट माहिती मिळत नाही. त्यामुळे नेमके किती डबे रुळावरून घसरले हे अद्याप निश्चित नाही. पाकिस्तान सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. संबंधित यंत्रणांकडून आवश्यक माहिती घेतली जात आहे. तसेच मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. दुर्घटनेनंतर आसपासच्या रुग्णालयांमध्येही इमर्जन्सी प्रोटोकॉल घोषित करण्यात आला आहे.

India-Pakistan peace! बिथरलेला पाकिस्तान नरमला; भारताकडे केली चर्चेची मागणी

रेल्वेचा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे अपघाताच्या कारणांचाही शोध घेतला जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. या घटनेत आतापर्यंत 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी आधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube