Mall In Bengaluru Denies Entry Farmer Wearing Dhoti : शेतकऱ्यांना किंवा गावाकडच्या लोकांना शहरातील तथाकथित उच्चशिक्षितांकडून हीन वागणूक दिल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. असाच काहीसा प्रकार कर्नाटकातील बेंगळूरूमधील (Bengaluru) एका मॉलमध्ये समोर आला आहे. या मॉलमधील सुरक्षारक्षकांनी एका धोतर परिधान (Farmer Wearing Dhoti) केलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
भुजबळ फिरता रंगमंच तर, पवार मोठे…; राऊतांच्या मनात नेमकी कोणती स्क्रिप्ट?
काय आहे नेमकी घटना?
ही घटना कर्नाटकातील बेंगळूर शहरातील जीडी मॉलमध्ये मंगळवारी संध्याकाळी घडली. ज्यामध्ये या शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या वडिलांना चित्रपटा दखवण्यासाठी मॉलमधील थिएटरमध्ये तिकीट बुक केलं होतं. मात्र जेव्हा हे वडील आणि मुलगा मॉलमध्ये गेले. त्यावेळी गेटवरच सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेश नाकारला.
Very sad news! An elderly farmer denied entry in a mall in Bengaluru just because he was wearing a Dhoti.
CM @siddaramaiah ji himself wears a dhoti, he'll be banned too? Is it your idea to empower farmers? @DKShivakumar @RahulGandhi pic.twitter.com/IlRLlaqjt6
— Vishnu Vardhan Reddy (@SVishnuReddy) July 18, 2024
तसेच या सुरक्षारक्षकाने स्पष्ट सांगितलं की, अशा प्रकारचा ड्रेस परिधान करून म्हणजे धोतर घालून कोणताही व्यक्ती मॉलमध्ये जाऊ शकत नाही. तसे मॉलचे नियमच आहेत. या धोतर घातलेल्या वडिलांनी सुरक्षारक्षकाला अनेक विनवण्या केल्या. त्यावर या सुरक्षारक्षकाने मॉलमध्ये प्रवेश करायचा असेल तर धोतराच्यावरती घातलेल्या शर्टवर जॅकेट परिधान करावे लागेल. असा पर्याय सुचवला. मात्र त्यांना प्रवेश काही मिळाला नाही.
Aishwarya Divorce :ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांना अभिषेक बच्चनचा पूर्णविराम! चाहत्यांनाही धक्का
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरांकडून त्यावर प्रचंड टीकेची झोड उठली आहे. मात्र अद्याप मॉलच्या व्यवस्थापनाकडून या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.