ऑपरेशन सिंदूननंतर पहिल्यादांच 5 ऑक्टोबरला भारत- पाकिस्तान भिडणार , ICC ची मोठी घोषणा
Women's ODI WC 2025: भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे (Women's ODI WC 2025) वेळापत्रक

Women’s ODI WC 2025: भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे (Women’s ODI WC 2025) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये 5 ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तानमध्ये (IndvsPak) सामना होणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यादांच क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तानी संघ आमने सामने येणार आहे. या विश्वचषकामध्ये पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहे.
महिला विश्वचषकाचा पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात बेंगळुरूमध्ये खेळला जाईल. तर अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू (Bengaluru) किंवा कोलंबोमध्ये (Colombo) खेळला जाईल. जर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहचला नाही तर या स्पर्धेचा अंतिम सामना बेंगळुरू येथे होणार असल्याची माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघ 5 ऑक्टोबर रोजी कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर आमनेसामने येतील. विश्वचषक 30 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया 1 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
The moment we’ve been waiting for! 🏆
The Women’s Cricket World Cup 2025 fixtures are OUT! 🗓🔥@ICC pic.twitter.com/qiAjB9arxI
— BCCI (@BCCI) June 16, 2025
महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे संपूर्ण वेळापत्रक
30 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका, बेंगळुरू
1 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, इंदूर
2 ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
3 ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बेंगळुरू
4 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, कोलंबो
5 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
6 ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, इंदूर
7 ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध बांगलादेश, गुवाहाटी
8 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
9 ऑक्टोबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, विझाग
10 ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश, विझाग
11 ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, गुवाहाटी
12 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, विझाग
13 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, विझाग
14 ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, कोलंबो
15 ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
16 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, विझाग
17 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, कोलंबो
18 ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
19 ऑक्टोबर- भारत विरुद्ध इंग्लंड, इंदूर
20 ऑक्टोबर- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, कोलंबो
21 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
22 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, इंदूर
23 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड, गुवाहाटी
24 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, कोलंबो
25 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, इंदूर
26 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, गुवाहाटी
26 ऑक्टोबर- भारत विरुद्ध बांगलादेश, बेंगळुरू
29 ऑक्टोबर- उपांत्य सामना 1, गुवाहाटी/कोलंबो
30 ऑक्टोबर- उपांत्य सामना 2, बेंगळुरू
2 नोव्हेंबर- अंतिम सामना, कोलंबो/बेंगळुरू
अमेझॉन एमजीएम स्टुडिओजची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘निशांची’!