Download App

‘आमच्या उमेदवारासमोर तीन भाजपचे उमेदवार’; मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

Mallikarjun KHarge On BJP : आमच्या एका उमेदवारासमोर भाजपचे तीन उमेदवार निवडणुकीत उभे आहेत, ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय, असं म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun KHarge) यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. छत्तीसगडमधील प्रचारसभेतून ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत भाजपवर निशाणा साधला.

साहेबांसोबत भोजन करून अजितदादा अमित शाहांना भेटले… भाजपवाल्यांचे कन्फ्युजन झाले दूर

खर्गे म्हणाले, देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते प्रचार करीत आहेत. भाजपकडून आमच्या उमेदवारांसह त्यांच्या नातेवाईकांवर ईडी, आयकर विभागाकडून कारवाई करुन हल्ले केले जात आहेत. या निवडणुकीत एका विधानसभा मतदारसंघातून आमचा एक उमेदवार उभा आहे, मात्र भाजपने आमच्या एका उमेदवाराच्या विरोधात तीन उमेदवार उभे केले असल्याचं खर्गेंनी स्पष्ट केलं आहे.

‘अभ्यास करुन मराठ्यांच्या पोरांच्या बरगड्या मोडल्या’; जरांगेंनी वडेट्टीवारांना सांगितली सत्य परिस्थिती

जर तुम्ही विचाराल की ते कोण आहेत, एक ईडी, दुसरा इन्कम टॅक्स आणि तिसरा सीबीआय, अशा शब्दांत काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. तसेच भाजपने हिंदूंचा ठेका घेतला आहे का ? आपण हिंदू नाही का ? माझे नाव मल्लिकार्जुन आहे ज्याचा अर्थ शिव आहे.

Sujay Vikhe यांचा पाठपुरावा अन् घरकुलांच्या लाभार्थ्यांना अंतिम हप्ता मंजूर…

भाजपचे लोक आमच्या उमेदवारांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात, तसेच लोकांनाही घाबरवण्याचा प्रयत्न करतात आणि काँग्रेसला मत देऊ नका असे सांगत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

नौदल अधिकाऱ्यांना सुनावलेल्या शिक्षेविरोधा भारताकडून पुर्नविचार याचिका दाखल

ही केवळ विधानसभेची निवडणूक नसून ही निवडणूक देशाचे भवितव्य बदलून टाकणारी निवडणूक आहे. हे खूप महत्त्वाचे आहे कारण भाजप सरकार, मोदी जी आणि आरएसएस यांना देशातील संविधान बदलायचे आहे.

गरिबांना जे अधिकार मिळत आहेत, जे वंचितांना संविधानातून मिळत आहेत ते ते बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाचा पाच राज्यांत विजय होणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us