Sujay Vikhe यांचा पाठपुरावा अन् घरकुलांच्या लाभार्थ्यांना अंतिम हप्ता मंजूर…
Sujay Vikhe : खासदार सुजय विखे यांनी पाठपुरावा केला त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपरिषदेच्या घरकुल प्रकल्पातील 144 घरकुलांच्या अंतिम हप्त्याचे अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेतील लाभार्थी नागरिकांचे घरकुल बांधून पूर्ण होण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटला होता.
ED,CBI की इन्कम टॅक्स आम्हाला कशात अडकवणार? राज ठाकरेंच्या कार्यक्रमात जावेद अख्तरांचा सवाल
मात्र अद्यापही त्यांना घरकुल योजनेंतर्गत घराचा अंतिम हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे समस्त लाभार्थ्यांनी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे घरकुलाचा हप्ता मिळण्याबाबत धाव घेतली. दरम्यान खासदार सुजय विखेंनी केंद्र शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करून पैसे मंजूर करून घेतले आणि नागरिकांना मोठा दिलासा दिला.
Maratha Reservation : ‘जरांगेंमुळं मराठा तरुणांच नुकसान होतंय’; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
सुजय विखे यांच्या पाठपुराव्यामुळे घरकुलाच्या अंतिम हप्त्याचे 85 लाख 80 हजार रुपये मंजूर झाले असून ते संबंधित लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. घरकुलाचे रखडलेले पैसे मंजूर केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ मृत्युंजय गर्जे, नंदूशेठ शेळके, बंडूशेठ बोरुडे, रामनाथ बंग, रमेश गोरे , महेश बोरुडे, प्रतिक खेडकर, बबन सबलस व भारतीय जनता पार्टी, पाथर्डी यांच्या वतीने खा. सुजय विखे यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या सर्व घरकुल प्रकल्पाचा अंतिम हप्ता संबंधित नागरिकांना मिळवून देण्यासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांचे देखील विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच नागरिकांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदैव प्रयत्नशील भूमिका घेत राहील असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.