Maratha Reservation : ‘जरांगेंमुळं मराठा तरुणांच नुकसान होतंय’; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा (Maratha Reservation) आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत देत उपोषण तात्पुरते स्थगित केले असले तरी आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने केली जात आहे. यानंतर आता काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे मराठा समाजातील मुलांच्या भल्यासाठी नाही तर राजकीय फायद्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
Maratha Reservation: शरद पवार ते एकनाथ शिंदे; 44 वर्षांत मराठा आरक्षणाचे काय झाले ?
मराठा समाजाला दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणातून फायदा होत असेल तर तो मोठा फायदा आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांना ईडब्ल्यूएस आरक्षणापेक्षा राजकीय आरक्षणाचा फायदा घेण्याची भूमिका असावी. म्हणून ते आग्रही आहेत. मनोज जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत तर राजकीय फायद्यासाठी आग्रही आहेत असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे. सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा तरुणांचं नुकसान होणार आहे. अगोदर तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. ओबीसीत 372 जाती आहेत यात घेऊन फायदा होणार नाही. जरांगे पाटलांच्या म्हणण्यावरच सर्लकाही ठरवू नये. अभ्यास करून तरुणांनी निर्णय घ्यावा, असेही वडेट्टीवार म्हणाले.
मराठा तरुणांनी अभ्यास करून निर्णय घ्यावा
ओबीसी आरक्षणापेक्षा ईडब्ल्यूएस आरक्षणाचा अधिक फायदा होईल. खुल्या प्रवर्गात फार जाती शिल्लक राहणार नाहीत. म्हणजे नोकऱ्यांचा किंवा सवलतींचा जिथे संदर्भ येतो तेथे मराठा तरुणांचं फार मोठं नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत मराठा तरुणांनी अभ्यास करून हित काय याचा निर्णय घ्यावा, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
Maratha Reservation : ‘मराठा कुणबी नाही तर मग कोण?’ बच्चू कडूंचा भुजबळांना थेट सवाल