ED,CBI की इन्कम टॅक्स आम्हाला कशात अडकवणार? राज ठाकरेंच्या कार्यक्रमात जावेद अख्तरांचा सवाल

ED,CBI की इन्कम टॅक्स आम्हाला कशात अडकवणार? राज ठाकरेंच्या कार्यक्रमात जावेद अख्तरांचा सवाल

Jawed Akhtar : प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी ED,CBI की इन्कम टॅक्स आम्हाला कशात अडकवणार? असा सवाल राज ठाकरे यांच्या समोरच उपस्थित केला. ते राज ठाकरेंच्याच कार्यक्रमात आले होते. त्यावेळी बोलत होते. दरवर्षी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिपावलीनिमित्त दिपोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याचं यंदा 11 वं वर्ष आहे. यावेळी या कार्यक्रमाला जावेद अख्तर, सलीम खान आणि मराठी अभिनेता रितेश देशमुख यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

राज ठाकरेंच्या कार्यक्रमात जावेद अख्तरांचा सवाल

यावेळी या कार्यक्रमामध्ये मराठी अभिनेता रितेश देशमुख याने जावेद अख्तर आणि सलीम खान यांची मुलाखत घेतली. यावेळी जावेद अख्तर यांना लेखक म्हणून त्यांच्या मानधनावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी जावेद अख्तर यांच्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यांना विचारण्यात आलं की, जेव्हा चित्रपटांमध्ये अभितेने 15 लाख मानधन घेत होते. तेव्हा लेखक म्हणून सलिम-जावेद ही जोडी 25 लाख रूपये मानधन घेत होते.

Maratha Reservation : ‘जरांगेंमुळं मराठा तरुणांच नुकसान होतंय’; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

त्यावर जावेद अख्तर म्हणाले की, तुम्ही आम्हाला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्समध्ये अडकवणार आहात का? गरिब लोकांची चेष्टा का करता? तसेच आम्ही तेव्हा अभिनेत्यांपेक्षा जास्त मानदन घेत होतो. कारण तेव्हा अभिनेते कमी मानधन घेत होते. असं मिश्किल उत्तर देत त्यांनी उपस्थितांना खळखळून हसवलं.

Sunny Leone: सनी अन् डॅनियलच्या मुलांना PETA इंडियाचा कम्पॅशनेट किडचा खास अवॉर्ड

दरम्यान यावेळी जावेद अख्तर म्हणाले, काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्या पाहिजेत, मी नास्तिक आहे पण राम आणि सीता यांना खूप मानतो, माझ्यासारखे जे नास्तिक ते सुद्धा मानत असल्याचं विधान गीतकार जावेद अख्तर(Javed Akhtar) यांनी केलं आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठेतरी कमी झालं आहे. शोले जर आज आम्ही लिहिला असता तर त्यातील तो सीन ज्यामध्ये ती मंदिरात जाते आणि मागे धर्मेंद्र उभे असतात. तो सीन मी आज लिहिला नसता आणि सलीम खान यांनीही लिहिला नसता. आज यावर मोठा वाद झाला असता, असंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube