Download App

तुझ्या बापाला साथ दिली, गप्प बस; माजी पंतप्रधानांच्या मुलाला बोलताना खरगेंची जीभ घसरली

Mallikarjun Kharge यांनी भाषण केलं. मात्र माजी पंतप्रधान चंद्र शेखर यांचे पुत्र भाजप खासदार नीरज शेखर यांच्याशी बोलताना त्यांची जीभ घसरली.

Mallikarjun Kharge on Neeraj Shekhar in Parliament संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliament Budget Session 2025) आज पाचवा दिवस होता. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी भाषण केलं. मात्र या भाषणादरम्यान गोंधळ झाला. त्यामध्ये माजी पंतप्रधान चंद्र शेखर यांचे पुत्र भाजप खासदार नीरज शेखर यांच्याशी बोलताना जीभ घसरली.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?

संसदेमध्ये मल्लिकार्जुन खरगे हे डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या भारतीय रुपयाचे मूल्य या विषयावर बोलत होते. त्याचवेळी माजी पंतप्रधान चंद्र शेखर यांचे पुत्र आणि भाजप खासदार नीरज शेखर हे मध्ये बोलले. त्यावर नाराज होत खर्गेंनी त्यांना गप्प बसण्याचा सूचना केली. यावेळी बोलताना खरगेंची जीभ घसरली. ते म्हणाले, ‘तुझ्या बापाचा मी साथीदार होतो. तू काय बोलतो. मी तुला घेऊन फिरलो आहे. गप्प बस.’

धनंजय मुंडेंच्या मागचे शुक्लकाष्ठ संपेना… आणखी एक प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता

मात्र यावर सभागृहाचे सभापती जगदीप धनखड यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले चंद्र शेखर हे देशातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहे. त्यांच्याबद्दल अशा प्रकारे वक्तव्य केले जाऊ शकत नाही त्यामुळे खरेदींनी त्यांचा वक्तव्य मागे घ्यावा तर खरे म्हणाले कोणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नाही उलट भाजपकडूनच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा वारंवार अपमान केला गेला आहे.

तुम्ही बिनजोड पैलवान, आशीर्वाद राहू द्या…; ठासून भाषण करता करता धस अचानक झाले भावूक

दरम्यान सध्या सगळीकडे डॉलरच्या तुलनेत फक्त घसरलेलाच नाही तर रसातळाला पोहचलेल्या रूपयाची एकच चर्चा सुरू आहे. इतिहासात पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत 87.29 वर पोहचली. त्यावरून आता एकीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे.

follow us